पान:महमद पैगंबर.djvu/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुसंवटनेचा महामंत्र २२३: ज्यांच्या ठिकाणी दातृत्वबुद्धि आहे व ज्यांना परिस्थितीची अनुकूलता आहे असे हिंदुहि शहरांतून व खेड्यांतून हजारों नसले तरी शेकडों आहेत. या दोघांची हिंदुत्वाच्या भूमिकेवर सांधेजोड घडवून आणणे हे हिंदुसंघटनवादी कार्यकर्त्यांचे काम आहे. या सर्व प्रकाराचे सूत्रमय वर्णन असे करता येईल की, हिंदुसंघटनवाद्याने दररोज लक्ष्मी-नारायणाचे दर्शन घेतले पाहिजे. एका दरिद्रीनारायणाच्या घरांत जाऊन त्याच्याशी समरस । होणे आणि त्याच्या दैन्याचा थोडाफार परिहार करू शकेल अशा * .. लक्ष्मीवंताशी त्याचा संयोग घडवून आणणे हे हिंदुसंघटन: वाद्याच्या नित्य क्रमांतलें एक कार्य होऊन बसले पाहिजे. हिंदुसंघटनवादी या वृत्तीने पाहू लागतील व वागू लागतील तरच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेल्या वर्गसमन्वयाच्या पायावर हिंदु समाजाची उभारणी करता येईल. वर्गविग्रह निर्माण करणारे लोक हे स्वतःच्या कर्तबगारीने हिंदुसमाजाला प्रिय होत आहेत, अशांतला भाग नाहीं. | दैन्यामुळे टेकीस आलेल्या गरीबगुरीब हिंदूंना या वैदूंचेच 3 तेवढे दर्शन होते; चांगल्या वैद्यांचे त्यांना दर्शनच घडत नाहीं; आणि राहाण्याला आधार तरी सांपडतो ! वर्गसमन्वयाचे तत्त्व न्यायाच्या भूमिकेवरून अमलात आणण्याचा निश्चय केलेले हिंदुसंघटनाबादी कार्यकर्ते समाजांत चौफेर फिरू लागतील तर मालक व मजूर, जमीनदार व शेतकरी अशा प्रकारच्या सर्व वर्गाच्या गैरसमजुती : तेचे निवारण करू शकतील. मालक, मालक' असला म्हणून त्याने आपण : मनुष्य आहों में विसरून चालणार नाही आणि तो जर माणुसकीला जागेल । तर हिंदु मजूरहि सहसा वर्दळीवर येणार नाहींत. वर्दळीवर येऊ नये ही जी। हिंदंची उपजत प्रवृत्ति ती हिंदुमजुरांतहि असतेच असते. प्रसंग निकरावरच., आला म्हणजे हिंदु मजूर या प्रवृत्तीला पारखा बनतो. 5. .: मालकांना , माणुसकीच्या बंधनांत ठेवणे आणि वर्दळीवर.. येण्याच्या प्रसंगांपासून मजुरांची मुक्तता करणे ही कामें हिंदू-... संघटनवाद्यांना हाती घ्यावी लागतील...... .. .. .....