पान:महमद पैगंबर.djvu/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ पाकिस्तानचे संकट समप्रमाण वांटणी या दोन्ही दृष्टींनी तो थारेपालट अधिक श्रेयस्कर . व अधिक फलदायी ठरणार नाहीं काय ? आज हे उत्सव ज्या त-हेने साजरे होतात व या उत्सवांमुळे ज्यांचे मनोरंजन होते त्या त-हेचा व त्या लोकांचा विचार केला म्हणजे, तृषात भागल्या जीवा । मिळेना थेंबभर पाणी ।। ‘जयांची वासना-पुति । तयांसी अमृतीं न्हाणी ।। ।। या कविवचनाचे स्मरण झाल्याशिवाय राहात नाहीं. | हिंदु समाजांत जी विषमता नांदत आहे त्या विषमतेचीं अनेक उदाहरणे दाखविता येतील. उत्सव हे त्यांतले एक साधे उदाहरण होय. ही विषमता चौफेर पसरलेली आहे आणि ती नष्ट करण्याचे उद्योग सतत व जाणतेपणाने झाले तरच खरे हिंदुसंघटन घडू शकेल. ही विषमता नष्ट करण्याची जुनीं साधने समाजांतून नाहींशीं होत चालली आहेत. आणि त्यांच्या जागीं नवीं साधने निर्माण करण्याची तत्परता दाखविली गेलेली नाहीं. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, ज्ञानयज्ञ, शक्तियज्ञ इत्यादि यज्ञद्वारा समाजांतील विषमता नाहींशी, करण्याचे जुने मार्ग बुजून गेले आहेत. पूर्वीच्या काळीं ब-या स्थितीतल्या कुटुंबांतून अशी रीत आढळे कीं, चातुर्मास्यांत बाळभूक म्हणून गरीब. कुटुंबांतल्या एकाद्या अर्भकाला नेमाने थोडेफार दूध द्यावयाचे. । । ज्याच्याजवळ अधिक आहे त्याने गरजवंताला त्यांतलें थोड़ेफार दिले पाहिजे, या सिद्धांताची अंमलबजावणी अशा रीतीनें . पूर्वी होत असे. आपल्या समाजांत रूढ असलेल्या कहाण्या, व्रतेंवैकल्ये व रिवाज यां यामागील. उद्देशांचा या दृष्टीने कोणी तपास केला तर हिंदुसमाजांत समता प्रस्थापन, करू पहाणान्यांना तो उद्योग फार मार्गदर्शक ठरेल. सुस्थितींतल्या कुटुंबाने गरीब कुटुंबांतल्या एका अर्भकाला दूध पुरवावे अशी रीत पूर्वीच्या काळीं असे. आज त्या रीतीला वेगळे वळण लावून हिंदुसंघटनवाद्यांना तोच उद्देश साध्य करावा लागेल. ज्या तीन वर्षांच्या खालील मुलांना दुधाचा टांकहि मिळू शकत नाहीं अशी मुले शहरांत व खेड्यांत. हज़ारों आहेत.