पान:महमद पैगंबर.djvu/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुसंघटनेचा महामंत्र

२१७

त्याला आपल्या अंतरंगांतील मानवी शक्तीचा कण नि कण कार्य क्षम बनविला पाहिजे. १०. आजवर आपण ज्या कल्पना उराशीं घट्ट बाळगून बसलो आहोत त्याच कल्पनांना आपण यापुढेहि बिलगून बसू तर, आपल्यामधील अफाट मानवी शक्ति प्रभावशाली ठरूच शकणार नाहीं. ही शक्ति प्रभावशाली करण्याचे पहिले साधन म्हणजे आपल्या डोक्यांत भिनून गेलेल्या कुकल्पना साफ झाडून टाकणे हे होय. . कुकल्पनांची चौफेर माजलेली दलदल पार नाहींशी होईल आणि स्वच्छ बुद्धि नव्या दृष्टीने परिस्थितीचा विचार करूं लागेल त्या वेळींच हिंदुसंघटनेच्या कार्याची खरीखुरी सुरुवात होईल. ज्या बुरसटलेल्या कल्पना हिंदुसंघटनवादी हिंदूंनी तत्काळ सोडल्या पाहिजेत त्यांतली पहिली कल्पना बाटाबाटीबद्दलची होय. हिंदु वाटू शकत नाहीं हा त्रिकालाबाधित सिद्धांत प्रत्येकानें । सदैव स्मरणांत ठेविला पाहिजे. १. हिंदु वाटतो असे मानणे अगर म्हणणे हे माणुसघाणेपणाचे नसून हिंदुघाणेपणाचे लक्षण आहे, असे ओळखण्याला आपण स्वतः शिकले पाहिजे व इतरांनाहि ते पटवून देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. स्वेच्छेने, जाणूनबुजून, समजूनउमजून एकाद्या हिंदूने हिंदुसमाज सोडला आणि त्याने परसमाजांत प्रवेश केला तरच तो हिंदुत्वाला मुकू शकेल–तरच तो बाटेल-हैं। नवे सूत्र यापुढे लक्षांत बाळगले पाहिजे. ख्रिस्त्याच्या हातचा पावच काय, खिस्त्याचा सबंध हातचा हात पोटांत गेला तरीहि हिंदु पूर्वीइतकाच शुद्ध हिंदु राहातो, हे नव्या युगांतलें आपलें नवें शास्त्र होय. हिंदु कशानेंहि.बाटू शकत नाही ही सत्कल्पना मनावर कायमची कोरून ठेवणे हे जसे हिंदुसंघटनेच्या कार्याचे एक अंग आहे तसेच, कोणताहि हिंदु केवळ जन्मामुळे दुस-या हिंदू हुन श्रेष्ठ असू शकत नाहीं, या कल्पनेचा चौफेर पुकारा करणे हे हिंदुसंघटनेचे दुसरें : प्रधान अंग होय. ।।।।।। आजपर्यंत हिंदु समाजांत रूढ असलेली चातुर्वण्र्याची कल्पना व त्या कल्पनेच्या बरोबर सावलीप्रमाणे वावरणारी जन्मसिद्ध श्रेष्ठकनिष्ठपणाची