पान:महमद पैगंबर.djvu/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ पाकिस्तानचे संकट प्रश्नानेच हिंदुसंघटनेच्या प्रश्नाचा विचार सुरू करावयाला हरकत नाहीं. असा विचार सुरू केला कीं, मन जे उत्तर ताडकन् देईल ते हें कीं, सात कोटींच्या राष्ट्रांत प्रभावी मानवशक्ति ( Effective Manpower) अधिक असल्यामुळेच ते राष्ट्र तीस कोटींच्या लोकसमूहालाहि भारी ठरू शकते. हिंदु समाजांत सुमारे तीस कोटी माणसे आहेत हे सत्य केवळ । शिरगणतीच्या तक्त्यापुरते खरे आहे. प्रभावी कार्यकर्तृत्वाच्या दृष्टीने ते सत्य असत्यरूपच आहे. कार्यकर्तृत्वाच्या दृष्टीने या तीस कोटींच्या समाजांतील जास्तीत जास्त माणसे सर्वांगांनी कार्यक्षम बनविणे म्हणजेच ख-या अर्थाने हिंदुसंघटन करणे होय. या दृष्टीने आजच्या हिंदुसमाजाकडे दृष्टि वळविली तर त्या समाजांत कोणती हृदयविदारक दृश्ये दिसतील ? तीस कोटींत जो दहा अकरा कोटी तरी स्त्री समूह असेल तो स्त्रीसमूह गृहरक्षण, प्रजोत्पादन, प्रजा-संवर्धन इत्यादि दृष्टींनींहि पूर्णपणे कार्यक्षम असता तर मोठीशी फिकीर बाळगण्याचे कारण नव्हते. पण, दुर्दैव असे की, या मर्यादित क्षेत्रांतहि या कोटिसंख्य स्त्री समाजाची कार्यक्षमता प्रत्यहीं कमीकमीच होत चालली आहे. हिंदुसमाजांत जीं अल्पसंख्य कुटुंबे सांपत्तिक सुस्थितीत आहेत त्यांना त्या संपत्तीमुळे नाहीं ते चोचले सुचू लागल्यामुळे, त्या थरांतील स्त्रीवर्गाची या बाबतींतली कार्यक्षमता ओसरू लागली आहे; आणि अठरा विश्वे दारिद्रयाशीं दररोज झगडणारा जो बहुसंख्य हिंदु समाज त्यांतील स्त्रीवर्ग अज्ञानाच्या व दैन्याच्या झळी लागल्यामुळे या बाबतींत हळूहळू कमीकमी कार्यक्षम होत आहे. आपल्या समाजांतील दृश्यांचा हा चित्रपट सध्या युध्यमान असलेल्या राष्ट्रांतोल दृश्यांच्या समोर उभा केला म्हणजे हिंदुसमाज खरोखर कोठे उभा आहे, याची कल्पना पटू लागते. स्त्रियांचीं स्त्रीजीवनविषयक कर्तव्ये पार पाडून जर्मनी, इंग्लंड, जपान, इटली इत्यादि देशांतील स्त्रिया पुरुषांचीं म्हणून समजली जाणारी अनेक कामें चातुर्याने व धैर्याने करू शकतात आणि म्हणूनच पांच कोटींची आणि सात कोटींचीं हीं टीचभर राष्ट्रे सा-या जगाच्या छातीत धडकी भरवू शकतात. । .. हिंदुराष्ट्रहि असेच भीमपराक्रमी व्हावयाचे असेल तर .....