पान:महमद पैगंबर.djvu/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ पाकिस्तानचे संकट एकच उत्तर दिले पाहिजे. आपलें धमक वैशिष्टय टिकविण्यापुरते स्वातंत्र्य घेऊन येथे राहण्याची तुमची इच्छा असेल तर तेवढे स्वातंत्र्य मागण्यापुरताच तुम्हांला अधिकार आहे; यापलीकडे तुमचा कोणताहि अधिकार येथे मान्य होणार नाहीं; हिंदुस्थानची हिंदुसत्ता तुम्हाला सहन होत नसेल तर हा देश सोडून अरबस्थानांत, साहारा वाळवंटांत अगर तुमचे लाड करणा-या इंग्रजांच्या इंग्लंडांत जाऊन राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे; आणि तो तुम्ही जितक्या लवकर गाजवाल तितकें श्रेयस्कर ठरणार आहे हे एकच उत्तर मुसलमानांची समजूत पडण्याला पुरेसे आणि प्रभावी ठरणार आहे. या दृष्टीने भोंवतालच्या सृष्टीकडे पाहू लागल्यावर, डॉ. आंबेडकर यांना संरक्षणाबाबतचे आपले निष्कर्ष बदलण्याची बुद्धि झाल्याविना राहणार नाहीं, असे मानण्याला हरकत नाहीं. । |पंजाबमधील कांहीं जिल्हे निहन्दु बनवून आणि बंगालमध्येहि तोच प्रकार घडवून आणून डॉ. आंबेडकरांनीं जें पाकिस्तान बनविण्य चा संकल्प केला आहे त्या पाकिस्तानच्या सिद्धीमुळे एक कटकट कायमची मिटेल अशी डॉ० आंबेडकरांची समजूत आहे. आज हिंदुस्थानच्या प्रत्येक प्रांतांत हिंदु व मुसलमान यांची संमिश्र वस्ती असल्यामुळे आणि उभ्या हिंदुस्थानांत एकंदर लोकसंख्येपैकीं चौथा हिस्सा लोकवस्ती मुसलमानांची असल्यामुळे, प्रांतिक सरकारें व मध्यर्वात सरकार या सगळ्यांचीच घडण संमिश्र बनते आणि उठल्याबसल्या मुसलमानांच्या प्रश्नाचे भेडसावणारें भूत मानगुटीस बसते, ते शक्य तोंवर थांबावे असे डॉ. आंबेडकरांना मनापासून, प्रामाणिकपणाने वाटत आहे. त्यांनी संकल्पिलेले मर्यादित स्वरूपाचें पाकिस्तान सिद्ध झालें तर, आज हरघडी होणारे जातीय बखेडे थांबतील असाहि डॉ० आंबेडकरांचा समज आहे. आणि या महत्त्वाच्या गोष्टी हातीं पडण्यासाठीं, सिंध, वायव्यसीमाप्रांत, बलुचिस्थान व पंजाबचे कांहीं जिल्हे यांचे मिळून एक मुस्लीम राज्य आणि पूर्वबंगालचे कांहीं जिल्हे आणि सिल्हेट हा आसाममधील जिल्हा यांचे मिळून दुसरें मुस्लिमराज्य स्थापन होण्याला हरकत नसावी, अशी डॉ० आंबेडकरांची विचारसरणी आहे. अशीं मुस्लिम राज्ये स्थापल्याने हिंदुस्थानांतल्या हिंदूंच्या मागची मुसलमानांची कटकट खरोखरच थांबणार आहे कों काय, या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर देणारा मि० रहमतअल्ली यांच्या