पान:महमद पैगंबर.djvu/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ | पाकिस्तानचे संकट तरी तेथील मंत्रिमंडळाने तशा आशयाचा ठराव पास करून घेतला असता. यांतलें कांहींच घडलेलें नाहीं; आणि, मध्यवर्ती कारभारांत लोकसत्तेचा • चंचुप्रवेश होतांच मुसलमानांचा जीव कासावीस होऊ लागला, या घटना कमी सूचक नाहींत ! इमारत पक्की बांधून झाल्यावर पाडापाड करण्याचा प्रसंग येऊन सगळाच रोंधळ होण्यापेक्षां इमारतीचा पाया भरतांनाच दूरवरचा विचार केला जावा आणि म्हणून पाकिस्तानची मागणी वेळीच मान्य करण्यात यावी असेहि डॉ० आंबेडकर यांनी म्हटले आहे. नव्या घटनेचे नकाशे काढण्यांत आणि तिचा पाया भरण्यांत उणीपुरीं पांच वर्षे गेलेली आहेत. या कामानिमित्त लक्षावधि रुपये खर्च झालेले आहेत, यासाठी कित्येक कमिशनें बसली आहेत व तीन गोलमेज परिषदा भरल्या आहेतहे निदान डॉ० आंबेडकरांनीं तरी विसरू नये ! इमारतीच्या नकाशापासून सर्व उद्योग पुरे होऊन आतां फक्त कळस निर्माण व्हावयाचा राहिलेला आहे. या कळसाचे बांधकामहि हळुहळू पण नेटाने पुढे रेटण्यांत येत आहे. या इमारतीचे एक भव्य दालन संस्थानिकांसाठी मोकळे ठेवण्यांत आलेले आहे. इतरांशी मिळते घेऊन या दालनांत येऊन बसावयाचें कीं नाहीं हा प्रश्न संस्थानिकांनीच सोडवावयाचा आहे. इतकी सर्व सिद्धता झाल्यानंतर, या इमारतीची चार दालने । बंडखोरी करून अलग होऊ लागली तर ती बंडखोरी कोण सहन करील ? * डॉ० आंबेडकरहि ही बंडखोरी मनापासून सहन करीत नसले पाहिजेत असे त्यांच्या लिहिण्याच्या रोखावरून दिसते. या बंडखोरांना वेगळे काढल्याने हिंदूचेच परिणाम हित होईल अशी समजूत झाल्यामुळेच, त्यांना ही बंडखोरी क्षम्य वाटत असावी. ही बंडखोरी सहन करणे हिंदूंच्या हिताचेच ठरेल ही डॉ. आंबेडकरांची भावना कितपत बरोबर आहे या मुद्यांचा विचार पुढील प्रकरणांत स्वतंत्रपणे करणे सोईचे होईल.

  • Thoughts on Pakistan, p. 5.