पान:महमद पैगंबर.djvu/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ पाकिस्तानचे संकट कटकटी खरोखर कितीशा टळतील, कटकटी टाळण्याच्या हेतूने प्रेरित होऊन मुलूखचे मुलूख सोडून देण्याचे तत्त्व कितीसे श्रेयस्कर ठरेल, इत्यादि महत्त्वाच्या मुद्यांचा विचार पुढील प्रकरणांत स्वतंत्रपणे करावयाचा आहे. या ठिकाणी डॉ० आंबेडकरांना बारीकसा पहिला प्रश्न विचारावयाचा तो हा की, लोकसंख्येची अदलाबदल करण्याचे ठरविण्यापूर्वी, या अदलाबदलीमुळे ज्यांच्या जीवितावर महत्त्वाचे परिणाम घडणार त्या लोकांची संमति घ्यावयाला नको काय ? मुसलमान प्रांत वेगळे तोडून देण्याला जर स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाचा आधार शोधावयाचा तर त्याच तत्त्वाची अंमलबजावणी या अदलाबदलीच्या बाबतींत कां होऊ नये ? ही अंमलबजावणी करावयाची तर ती कोणत्या धोरणानुसार करावयाची ? अशा त-हेच्या प्रश्नांव्यतिरिक्त आणखीहि एक प्रश्न महत्त्वाचा म्हणून डॉ० आंबेडकरांना विचारण्यासारखा आहे. पंजाबमधील फिरोजपूर, गुरुदासपूर, जालंदर वगैरे ज्या सहा सात जिल्ह्यांत शीख व हिंदु यांच्या संयुक्त लोकसंख्येचे श्रेष्ठत्व निर्विवाद सिद्ध होत आहे ते जिल्हे 'इंडसुस्तान' मध्ये कोंबण्याला पाकिस्तानवाले प्रवृत्त झालेले आहेत. काय वाटेल तें झालें तरी हे जिल्हे घालविण्याला मुसलमान राजी होणार नाहींत हें 'पंजाबी यांनी आपल्या पुस्तकांत निःसंदिग्ध शब्दांत बजाविलें आहे.* हे जिल्हे मांगण्याचा हट्ट मुसलमान धरतील तर त्यांना काय उत्तर द्यावयाचे हे डॉ० आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलेले आहे. “पाकिस्तानचे मुस्लीम राज्य निर्माण झाले आणि या राज्याचा अंतस्थ कारभार व बाह्य संबंध हे स्वतंत्र झाले तर, हे राज्य मध्यर्वात सत्तेच्या नियंत्रणापासून सर्वस्वी मुक्त होईल; आणि, त्या राज्यांत अल्पसंख्य हिंदु असतील तर, त्यांना दाद मागण्याची सोय कोठेच उरणार नाही. राज्यसंस्थेने त्यांना अपाय केला तर, त्यो राज्यसंस्थेला लगाम घालण्याच्या हेतूने मध्यस्थी करू शकेल अशी सत्ताच अस्तित्वांत राहणार नाही. तुर्काच्या अंमलाखाली आर्मीनियन लोकांचा, झारशाहींत अगर नाझीशाहींत ज्यूंची जी गत झाली तीच गत पाकिस्तानमधील हिंदूंची सहजासहजीं होईल. अशी योजना असह्य ठरेल आणि 1,--*Confederacy of India, p.184..... ........ ! .. ।