पान:महमद पैगंबर.djvu/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० पाकिस्तानचे संकट अगर हिंदु संस्कृतींत समाविष्ट करण्याचे जे प्रयत्न झाले त्या प्रयत्नांपायीं सहस्रावधि हिंदूंना आपले प्राण त्या पवित्र रणक्षेत्रावर ठेवावे लागलेले आहेत. आपल्या अनेक पूर्वजांनी लढून-झगडून आत्मसात् केलेले क्षेत्र ही भावना वाराणसी क्षेत्राभोंवतीं घुटमळत राहिलेली असल्यामुळेच, विरक्त अशा हिंदु संन्याशालाहि अद्याप वाराणसी क्षेत्राचे नांव उत्तेजक वाटते. अफाट समाजामध्ये ऐक्यभावना प्रस्थापित करण्याचे हे प्रयत्न एकाच कालखंडांत झाले, असें नाहीं. हिंदुस्थानांतील साधूच्या पंथांचा इतिहास त्या दृष्टीने कोणी लिहिलेला अद्याप पाहण्यांत नाहीं. पण, महाराष्ट्रांतल्या भागवतधर्मीय साधूनीं जें कार्य केले त्याचे स्वरूप अशाच प्रकारचे आहे, हे थोडा विचार केला असतां कोणालाहि मान्य करावे लागेल. श्री ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथीय साधु आहेत. या नाथपंथाचा उगम महाराष्ट्राबाहेर बहुधा बंगालमध्ये झाला असावा, असा समज आहे. बंगालमधील एका पंथाचा प्रसार महाराष्ट्रापर्यंत होऊन,श्री ज्ञानेश्वर महाराज त्या पंथांत सामील होतात ही गोष्ट, त्या काळची दळणवळणाचीं अपुरी साधने लक्षात आल्यावर, अदभुत वाटते. आणि, या ग्रंथांत शिरलेल्या या 'ज्ञानियांच्या राजा'ने केले काय हे पाहिले म्हणजे तर मन थक्कच होते. गीतेसारख्या अलौकिक ग्रंथांतील ज्ञानभांडार संस्कृत भाषेमध्ये कोंडले गेले असल्यामुळे, त्याचा खुराक समाजांतील फार मोठ्या वर्गाला मिळू शकत नव्हता. या परिस्थिती मुळे समाजांतील बहुसंख्य वर्ग आणि अल्पसंख्य पंडित यांच्या दरम्यान वैचारिक साम्य निर्माण होऊ शकत नव्हते. या विचाराने अस्वस्थ होऊन, श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ही ‘कोडिसवाणी श्रुति' मराठी भाषेत प्रकटविली आणि स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र (आनिया) एवढ्या मोठ्या वर्गाला त्यांनी हें ज्ञान सुलभ करून दिले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतल्या नामदेव महाराजांचे कित्येक अभंग पंजाबमधील शिखांच्या धर्मग्रंथांत मान्यता पावलेले आहेत. ही साधूची मंडळे, साधूचे हे गुप्त पंथ' अथांग हिंदु समा• जांत वैचारिक व सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्याचे केवढे कार्य करीत होतेज्या वेळी साक्षरताप्रसारासाठी अँटस् दिल्या जात नव्हत्या, वैचारिक साम्य निर्माण करण्याची वृत्तपत्रे, रेडियो, बोलपट वगैरे साधने युरोपांतहि निघालीं नव्हती आणि प्रवास अत्यंत कष्टमय होता. अशा युगांत साधूंच्या या