द्विराष्ट्रवादाचे खंडन १४९ या देशांतील कोट्यवधि हिंदु लोकांची सांस्कृतिक भाषा संस्कृत हीच आहे हे विसरून चालणार नाहीं. । वैदिक संस्कृत भाषा हळुहळू मागे पडू लागली आणि वाढत्या हिंदुसमाजाच्या गरजांच्या मानाने ती कठिणहि भासू लागली. तेव्हां प्राचीन विचारवीरांनी बहुजन समाजाच्या ज्ञानसंवर्धनासाठी पुराणे रचिलीं. वाढत्या समाजांत वाढत व बदलत जाणारे विचार, त्या समाजांत उद्भवणारी नवीं नवीं तत्त्वज्ञानें, त्या समाजाला रुचू लागणारी नवी नवीं दैवते या सगळ्यांचा समन्वय साधण्याचे व या सर्वांमधील संघर्षाचा शक्य तोंवर परिहार करण्याचे बिकट कार्य हिंदुसमाजांतील विचारवीरांना मधून मधून करावे लागले आहे. व्यास व वैशंपायन यांच्या वेळच्या त्रोटक भारताला महाभारत में स्वरूप देणा-या सौतीने प्राचीन काळीं हेंच कार्य केले. एवढ्या अफाट देशभर पसरलेल्या लोकांच्या चित्तांत देशाच्या ऐक्याची कल्पना स्थिर व्हावी म्हणून अनेकांकडून विविध प्रयत्न करण्यांत आलेले आहेत. आद्य शंकराचार्यांनी आपले जे चार मट स्थापिले ते हिंदुस्थानच्या चार भिन्न टोकांना स्थापण्यांत त्यांच्या हाच हेतु दिसतो. अयोध्या, मथुरा, द्वारका, कांची इत्यादि तीर्थक्षेत्रांची यादी पाहिली तर तिच्यांतहि । देवीगीतेत देवीची म्हणून जीं प्रसिद्ध स्थाने सांगितलेली आहेत त्यांत कलकत्ता, काशी, पंजाबमधील कांग्रा, मदुरा वगैरे स्थानांचा उल्लेख आहे. त्याप्रमाणेच, नेपाळ व चीनमधीलहि स्थानांचा उल्लेख आहे. भाषेचे ऐक्य, विचारांचे ऐक्य व प्रदेशाचे ऐक्य या कल्पनांनीं हिंदुस्थानांतील अफाट मानवसमाज एकत्र निगडित करण्याचे असे प्रयत्न पूर्वी झालेले असल्यामुळेच या देशाला सांस्कृतिक ऐक्य प्राप्त झालेले आहे आणि ती संस्कृति हिंदु संस्कृतीच आहे, असे म्हणणे प्राप्त आहे. हिंदुस्थान ही हिंदूंची नुसती पितृभू नसून पुण्यभूहि आहे असे बॅ० सावरकर ठसकेबाजपणाने सांगतात त्यांतलें रहस्य हेच आहे. एखाद्या राजराजेश्वरापासून तर एखाद्या भिक्षाधीशापर्यंत सर्व हिंदूंना काशी क्षेत्र म्हटले की, आजहि कांहीं एक अभिमान वाटतो. नवखंडाबाहेर असलेले हें काशीखंड तत्कालीन अनार्यापासून घेऊन तें व्यापक आर्य संस्कृतीत
पान:महमद पैगंबर.djvu/160
Appearance