Jump to content

पान:महमद पैगंबर.djvu/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्विराष्ट्रवादाचे खंडन १४७ 'पांतला आम्र्स अॅक्ट अस्तित्वात आलेला नव्हता. म्हणजेच असे कीं, आततायी माणसाला आवरण्याची शक्यता त्या वेळीं व्यक्तिमात्राच्या ठिकाणी आजच्याहुन अधिक होती. ही शक्यता कमी झाल्यामुळे, काटीलाठी या साधनांचा तरी स्वसंरक्षणार्थ नीट उपयोग व्हावयाला पाहिजे. पण दंगे सुरू होऊन अशांतता पसरली कीं, भांबावून गेलेले अधिकारी स्वसंरक्षणाची हीच साधने मामुली व्यवहार करणा-या नागरिकांच्या हातीं नांदू देत नाहीत ! निसर्गाने पुरविलेली हात, दांत वगैरे साधनेंहि आक्रमक स्वरूपाची आहेत असे समजून, अधिकारी त्यांच्या उपयोगावर अद्यापि नियंत्रण घालू लागले नाहीत, हेच भाग्य समजण्याची वेळ आली आहे ! 1. हिंदु समाजाच्या या असहायपणाचा फायदा घेऊन, वाटमारीच्या पद्धतीने आपले म्हणणे त्यांच्या गळी उतरवू पाहणा-या समाजाची पाकिस्तानची मागणी देऊन टाकावी असे डॉ. आंबेडकर म्हणत असतील तर, त्यांना कोणताहि स्वाभिमानी हिंदु असेच विचारील कीं, हिंदूंच्या या वृत्तीला शरणागतीच म्हणावे लागणार मांहीं काय ? मुसलमानांशी मिळते घ्यावयाचे तर ते शरणागतीच्या मार्गाने (Appeasement) घ्यावें कीं तडजोडीच्या मार्गाने (Settlement) घ्यावे असा मुद्दा डॉ. आंबेडकर यांनी आपल्या ग्रंथाच्या समारोपांत (पृ० ३४७ वर) उपस्थित केला आहे. त्यांनीच मोळा केलेल्या माहितीच्या आधारे त्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट शब्दांत असे आहे कीं, आततायीपणा करणा-या लोकांशी मिळते घेण्याचा विचारहि मनांत आणणे हे समाजाच्या अगर राष्ट्राच्या स्वाभिमानाच्या दृष्टीने शक्यच नसल्याने, मुसलमानांशी कोणत्या पद्धतीने मिळते घ्यावे हा मुद्दाच अप्रस्तुत आहे. : हिंदू व मुसलमान हीं दोन भिन्न राष्ट्रे आहेत असे गृहीत धरून मुसलमानांच्या भिन्नत्वाची अगर भिन्न राष्ट्रत्वाची जी मीमांसा डॉ० आंबेडकर यांनी केली आहे तिचे स्वरूप कसे सदोष आहे हे या विवेचनावरून स्पष्ट होईल. हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी वगैरे सर्वांची जूट घडवून आणण्याची गांधीजींची महत्त्वाकांक्षा, हिवाळ्यांत सकाळी दिसणा-या धुक्याप्रमाणे, गेल्या वीस वर्षांच्या काळांत हळूहळू पार विरून गेली आहे. अशा परिस्थितीत विचार शिल्लक उरतो तो एकच ! । ।।।।।।।.. .