पान:महमद पैगंबर.djvu/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ पाकिस्तानचे संकट यापूर्वी करण्यांत येत होते; पण अराले निमित्त किती खोटे असू शकते हे पैगंबरवासी मौ० शौकतअल्ली यांच्याच कबुलीवरून सिद्ध करता येण्यासारखे आहे. दिल्लीच्या ऐक्य परिषदेच्या वेळीं मौलाना महाशयांनी स्वतःच्या लग्नाच्या वेळची हकीकत निवेदन केली होती. रामपूर येथील मशिदीसमोर लग्नाच्या मिरवणुकीतील वाद्ये थांबविण्यांत आली नव्हतीं असे त्यांनीं कबूल केले होते. दिल्लीत मुसलमानी राजसत्ता नांदत होती तेव्हांहि असे प्रकार घडत नसत. वाजतगाजत जाणा-या रामलीलेच्या मिरवणुकी पाहण्यासाठी राजघराण्यांतील मंडळी मशिदींत जमत आणि मिरवणुकीतून चाललेल्या रामाच्या गळ्यांत हारहि घालीत ! बेंगॉल प्रेसिडेन्सी मुस्लीम लीगचे चिटणीस मि० कुतुबुद्दीन अहमद यांनी ऑगस्ट १९२६ मध्ये प्रसिद्धिलेल्या पत्रकांत असे स्पष्ट म्हटले आहे कीं, मशिदीपुढे वाद्ये बंद ठेवावीं या म्हणण्याचा शरियतशी अर्थाअर्थी कांहीं संबंध नसून, हे म्हणणे कोणा स्वार्थी व्यक्तींकडून अगर पक्षांकडून पिकविण्यांत आलेले आहे. पूर्वी हिंदूंच्या कुरापती काढग्याला मुसलमानांना अशीं कांहीं निमित्तं तरी शोधून काढावी लागत. पण, प्रांतिक स्वायत्तता सुरू झाल्यापासून बंगाल व सरहद्द प्रांत येथे जे प्रकार घडून येत आहेत त्यांच्या समर्थनार्थ कांहीं निमित्तहि देण्यांत येत नाहीं. सिंध प्रांतांत दररोज दोघा हिंदूंचे खून पडत होते असा बोभाटा मध्यंतरीं झालेला होता. वेळीच जागृत होण्याची प्रवृत्ति हिंदूत नाहीं हें खरेंच आहे। शिवाय, कायद्याने निर्माण केलेले अधिकारहि पुरेपूर वापरण्याचे शिक्षण त्यांस मिळालेले नाहीं. 'हिंदूहि आतां प्रतिकार करण्याला शिकत आहेत आणि मुसलमानाच्या शरीरांत सुरा खुपसतांना त्यां हि आतां दयामाया वाटेनाशी झाली आहे, असे एक विधान आंबेडकर यांनी पृष्ठ २६७ वर केले आहे. गांधीजींच्या अहिंसेच्या शिकवणींत मुरलेला समाज असे कांहीं करूं लागेल, हे संभाव्य दिसत नाहीं. पण या समाजाने आत्मसंरक्षणाच्या कायद्याचा तरी भरपूर उपयोग करा-बयाला शिकले पाहिजे. इंडियन पीनल कोडमध्ये आत्मसंरक्षणाचीं (SelfDefence) कलमें समाविष्ट करण्यांत आली त्या वेळी सध्यांच्या कडक स्वरू