पान:महमद पैगंबर.djvu/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ ... पाकिस्तानचे संकट ......... हिंदूचे व मुसलमानांचे प्रमाण अनुक्रमें शेकडा ८३७२ व ११ असे असेल. असा हिशोब मांडण्यांत आलेला आहे. ‘राजस्थानी संघराज्य' या तिस-या संघराज्यांत ब्रिटिश हद्दीतला मुलुख मुळीच नसून, राजस्थानमधील सर्व संस्थाने व मध्यभारतांतील संस्थाने यांचा अंतर्भाव या संघराज्यांत होणार आहे. या संघराज्यांचे क्षेत्रफळ १,८०,६५६ चौरस मैल भरेल व त्यांत १,७८,५८,५०२ लोक नांदतील, असा अंदाज आहे. यांत हिंदु व मुसलमान यांचे शेकडा प्रमाण अनुक्रमे ८६:३९ व ८:०९ असे राहील. । - ‘दक्षिणी संस्थान संघराज्य' या संघराज्यांत हैद्राबाद, म्हैसूर, वे बस्तर संस्थाने यांचा अंतर्भाव होणार आहे. याचे क्षेत्रफळ १,२५,०८६ चौरस मैल भरेल व त्यांत २,१५,१८,१७१ लोक नांदतील असा अंदाज बांधण्यांत आलेला आहे. हिंदू व मुसलमान यांचे या लोकवस्तीतले प्रमाण अनुक्रमे शेकडा ८५°२६ व ८:९९ भरेल. 'बंगालो संघराज्य' या पांचव्या संघराज्यांत पूर्वबंगालमधील बहुतेक सगळा भाग, आसामचे गोलपारा व सिल्हेट हे :ोन जिल्हे आणि त्रिपुरा, कूचबिहार वगैरे संस्थाने यांचा समावेश व्हावयाचा आहे. या संघराज्याचे क्षेत्रफळ ५९,७६४ चौरस मैल भरेल असा अंदाज आहे. त्यांत नांदणाच्या ३ कोटी १० लक्ष लोकसंख्येत मुसलमानांचे शेकडा प्रमाण ६६:१ राहील व हिंदूंचे शेकडा प्रमाण ३३९ राहील, असाहि तर्क करण्यांत आलेला आहे. हीं जीं पांच संघराज्ये होणार त्या प्रत्येकावर एक गव्हनर जनरल सत्ता चालविणार व या संघराज्यांत समाविष्ट होणा-या प्रांतिक घटकांवर प्रत्येक एक या प्रमाणांत गव्हर्नरांची सत्ता चालणार ! या पांच संघराज्यांचे मिळून जे सरसंघराज्य बनणार त्याचा अधिकारी 'व्हाइसरॉय' या नांवाने ओळखला जाणार ! या संघराज्यांच्या व सरसंघराज्यांच्या कारभाराविषयीं पंजाबींनी जो तपशील मांडला आहे त्याच्याशीं पाकिस्तान ' अमान्य करणाच्या लोकांना तूर्त तरी कांहीं कर्तव्य नाहीं ! ।। ।। । पंजाबींच्या या संघराज्य-योजनेवर व सर-संघराज्यकल्पनेवरं डॉ०राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या शांतदांत काँग्रेसजनाने जे आक्षेप घेतले आहेत त्यांची नोंद करून ठेवणे अवश्य आहे. भौतिक, भौगोलिक वगैरे सर्व दृष्टींनीं हिंदुस्थान