पान:महमद पैगंबर.djvu/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुसलमानांनी मांडलेल्या पाकिस्तानच्या योजना १२५ स्तानच्या ज्या योजना तपशिलासह मांडण्यात आलेल्या आहेत, त्यांतहि हीच दृष्टि आहे. ‘पंजाबी'ची योजना ‘पंजाबी' हे टोपण नांव धारण करणा-या लेखकाने मांडलेली ‘पाकिस्तान'ची योजना Confederacy of India (भारताचे सरसंघराज्य) या नांवाने ओळखली जाते. या योजनेच्या जन्मदात्याने आपली योजना ग्रंथरूपाने लोकांपुढे मांडली आहे. हिंदुस्थानांत प्रथम पांच संघराज्ये (Federations ) स्थापन व्हावी आणि या सर्वांना एकत्र नांदविणारे सरसंघराज्य (Confederacy) अस्तित्वांत यावे असे 'पंजाबी'चे म्हणणे आहे. या पांच संघराज्यांतल्या पहिल्या संघराज्याला त्यांनी "The Indus Regions' Federation (सिंधु-स्तान संघराज्य) असे नांव दिले आहे. सिंध, वायव्य सरहद्दप्रांत, बलुचिस्तान, व (अंबाला जिल्हा, कांग्रा जिल्हा व होशियारपूर जिल्ह्यांतले उना व ग-शंकर तालुके एवढा भाग वगळून उरलेला) पंजाव एवढा सध्यांच्या ब्रिटिश हिंदुस्थानांतला भूभाग, व काश्मीर, भावलपूर, अंब, दीरस्वात, चित्रळ, खानपूर, कलात, लासबेला, कपूर्थळा व मालेरकोटला एवढा संस्थानी मुलुख या सगळ्यांचे मिळून सिंधु-स्तान संघराज्य बनावयाचे आहे. या क्रमांक १ च्या संघराज्यांत ३,९३,८३८ चौरस मैल क्षेत्रफळाचा भूभाग जात असून, त्यांत एकंदर ३ कोटी ३० लक्ष लोक नांदावयाचे आहेत. या लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण शेकडा ८२ असेल, शिखांचे प्रमाण शेकडा ६ असेल व हिदंचे प्रमाण शेकडा ८ असेल, असा अंदाज करण्यांत आलेला आहे. पांच संघ-राज्यांपैकी दुसरें संघराज्य 'हिंदुभारत संघराज्य' म्हणून ओळखले जावे, असे ‘पंजाबी' म्हणतात. संयुक्तप्रांत, मध्यप्रांत, ओरिसा, आसाम, मद्रास, मुंबई, बिहार व बंगालचा थोडासा भाग एवढा सध्यांच्या ब्रिटिश भारतांतला भूभाग आणि राजस्थानी संस्थाने व ‘दक्षिणी संस्थान संघराज्यांत' न घेतलेली संस्थाने हा संस्थानी विभाग यांचे मिळून हे हिंदू भारत संघराज्य' निर्माण व्हावयाचे आहे. या संघराज्याचे क्षेत्रफळ ७,४२,१७३ चौरस मैल असेल. त्यांत २१,६०,४१,५४१ लोक नांदतील व या लोकसंख्येत