पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सेवकांची भक्ति दृढ करण्यास, लोकांचे विचार सन्मार्गास लावण्यास व राजाला नीतीने वर्तन करविण्यास, समर्थासारख्या थोर विचारी महापुरुषांच्या ग्रंथांचा अत्यंत उपयोग झाला. महाराष्ट्रांत स्वराज्य स्थापण्याच्या कामी मराठ्यांच्या शौर्याचें व मराठयांच्या जुटोचें जितकें साहाय्य झाले तितकेंच, किंबहुना त्याहूनहि जास्त, साहाय्य समर्थांच्या उपदेशाचे झाल. राष्ट्रांतील लोकांना दिशा दाखविण्यास असल्या महात्म्यांची अवश्यकता सदा असते. समर्थ १६८१ त वारले. तदनंतर पंचवीस तीस वर्षे समर्थीच्या उक्तींचा नाद महाराष्ट्रांतील लोकांच्या कानांत घुमत होता. ह्या नादाच्या गुंगीत मराठयांनी १७२० पर्यंत स्वराज्याची स्थापना केली. पुढे बाजीराव बल्लाळाने व बाळाजी बाजीरावाने हिंदुपदबातशाहीची स्थापना करण्याच्या इराद्याने बहुतेक सर्व हिंदुस्थान देश पादाक्रांत केला. त्यावेळी ह्या मुत्सद्यांवर तिहेरी जोखीम आलें. पूर्वी शिवाजी व रामदास यांच्या वेळी (१) सामान्य जनांची मने तयार करावयाची व (२) सेवकलोकांत मत्सर शिरूं द्यावयाचा नाही एवढे दुहेरीच जोखीम त्यावेळच्या मुत्सद्यांच्या व विचारी पुरुषांच्या शिरावर होते. आतां (१) सातारच्या महाराजांचें सूत्र राखावयाचे, (२) राजमंडळांतील व इतर सरदारांची मनधरणी करावयाचें (३) व जिकिलेल्या प्रदेशांतील लोकांची मनें आपल्याकडे वळवून घ्यावयाचें तिहेरी काम बाजाराव बल्लाळ व वाळाजा बाजीराव ह्या मुत्सद्यांना अवश्य झालें. ह्या तिहेरी कामा - पहिले कलम ह्मणजे शाहराजाचे सत्र राखण्याचे काम ह्या मत्सद्यांनी उत्तम साधिलें. त्या कामी धावडशी येथील भार्गवराम बोबाचें साहाय्य पेशव्यांना चांगले झाले. भार्गवरामाचे शाहूवर वजन फार असून बाजीराव बल्लाळ व बाळाजी बाजीराव ह्यांच्याकडेहि पोटच्या पोराप्रमाणे त्याचा ओढा असे. त्यामुळे शाहूचें मन न दुखवितां पेशव्यांचे हित करून देणे धावडशीकर स्वामीला शक्य झाले. ज्याप्रमाणे शाहूराजाचे सूत्र ब्रह्मेद्राने राखिले त्याप्रमाणे सरदारांची मनधरणी करण्यास व जिंकिलेल्या प्रदेशांतील लोकांची मनें मराठ्यांच्याकडे वळवून घेण्यास पेशव्यांनी काही व्यवस्था केली होती असे दिसत नाही. कायगांवकर वासुदेव दीक्षित टोक्यास व काशीस राहून सलाबताच्या राज्यांत व काशीकर ब्राह्मणांत कांहीं खटपट करीत असत; परंतु त्यांच्या खटपटीहूनहि अवाढव्य खटपट करणारे व विचार पसरविणारे महापुरुष मराठ्यांच्या वाढत्या साम्राज्यांत एक जूट उत्पन्न करण्यास हवे होते. कानडे, तेलग, द्रवीड, गुजराथी, बुंदेले, रांगडे, पुरभय्ये, शीख वगैरे लोकांच्या मनांत महाराष्ट्रधर्माविषयी प्रेम उत्पन्न करण्याकरितां कोगत्याहि संस्था पेशव्यांनी स्थापलेल्या दिसत नाहीत किंवा त्या कामी कोणा महापुरुषाचें साहाय्य घेतलेलेंहि आढळत नाही. ह्यामुळे तरवारीच्या जोरावर व मुत्सद्यांच्या युक्तीवर भिस्त ठेवून पेशव्यांना हिंदुस्थानांत आपली सत्ता चालवावी लागे. मुसलमानांप्रमाणे पेशवेहि परकाय आहेत असा दजाभाव जिंकलेल्या प्रदेशांत कायम राही व परशत्रु आला असतां पेशव्यांचें जूं झुगारून देण्यास तेथील लोक तयार असत. आपली सत्ता किती अस्थिर आहे ह्याचा अनुभव