पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/333

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ येणेप्रमाणे वीस कावडी दिली. वडिलांस कळावं. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विज्ञापना. १८५ येणेप्रमाणे नानासाहेबांच्या दरवारी ह्यावेळी कर्ते मत्सदी कोण होते हे ह्या यादीवरून कळण्यासारखे आहे. स्वतः नाना, गोपिकाबाई, भाऊ, दादा, महादोवा पुरंधरे, बाबूराव फडणीस, सखारामबापू, हे ह्यावेळचे कर्ते मुत्सदी होत. पार्वतीबाई कोल्हटकरांची मुलगी व पांडववाडीच्या कोल्हटकरांचा व बावधनच्या खेरांचा विशेष घरोबा ह्मणून पार्वतीबाईचें नांव ह्या यादीत आहे. गोविंदपंतांची आई वावधनी रहात असे हे ह्या यादीवरून निष्पन्न होते. नाना पुरंधरे वगैरे दुय्यम प्रतीचे मुत्सदी आणीक होतेच. परंतु वर निर्दिष्ट केलेल्या सात मंडळीच्या हाती राज्याची सर्व सूत्रे होती. सखारामबापूचे वजन पुढे तर फारच झाले; परंतु ह्याहिवेळी बरेंच होते. विश्वासराव नुकते कामकाजांत पडू लागले होते. माधवरावाचें वय ह्या वेळी अवघे तेरा वर्षांचे होते; तरी ते १७५६ तील सावनूरच्या स्वारीत हजर होते. नानाफडणीस व मोरोबादादा दरवारांतील कानूकायद्यांचा नुकता कोठे अभ्यास करूं लागले होते. नानाफडणीस शके १६६३ च्या ज्येष्टांत व मोरोबा १६६४ च्या अश्विनांत जन्मला. नानाफडणिसाचा बाप जनादनपत इ. सन १७५६ च्या शेवटी वारला. नाना फडणिसाची जन्मकुंडली प्रसिद्धच आहे. मोरोबादादाची तितकी नाही ह्मणून येथे देतो. ही कुंडली मोरोबादादाच्या पुण्यातील वाड्यांतील एका लहानशा रुमालांतील आहे. । स्वस्तिश्री शके १६६४ दुंदुभिसंवत्सरे अश्विने मासि शुक्लपक्षे षष्ठीसहसप्तम्यां तिथौ भृगुवासरे मूलनक्षत्रे। अथ जन्मलग्नं सखेट. ९चं 7 बु ११Xगुश रास ह्यावरून मोरोबादादाहून नाना वडील होते हे उघड आहे. ह्यास आणीक पुरावा पाहिजे असल्यास खालील पत्र वाचावें. ॥श्री॥ . चिरंजीव राजश्री मोरोबादादा यासी बाळाजी जनार्दन आशीर्वाद. उपरि येथील कुशल