पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनाजानकाचावाल प्रस्तावना ew/ONLY 219 KARNATAM र पूर्वजांच्या इतिहासाची आस्था महासांत अलीकडील तीस पस्तीस वर्षात नव्याने झाली आहे. .(अ) यूनिव्हर्सिटी स्थापन होण्याच्यापूर्वी दादोबा पांडुरंगादि जी मंडळी झाली त्यांचा काल शालोपयोगी लहानमोठी पुस्तकें रचण्यात गेला. इतिहासाची साधनें शोधून काढण्याच्या कामी हळहळ दाखविण्यापलीकडे त्याच्या हातून विशेष काही झाले नाही. तरी पूर्वजांचा खरा इतिहास असावा अशी इच्छा त्यावेळी त्या लोकांना झाली हे ह्या हळहळीवरून अनुमानतां येते. (ब) डॉक्टर भाऊ दाजी, विश्वनाथ नारायण मंडलीका अमाशंकर याज्ञिक, कृष्णशास्त्री गोडबोले इत्यादि मंडळींनी त्या काली हिंदुस्थानच्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाविषयी बरेंच लिहिल आहे; परंतु, महाराष्ट्राच्या अलीकडील इतिहासाकडे, फार तर राहूंद्याच पण थोडे देखील, लक्ष्य देण्यास ह्या मंडळीला फुरसत झाली नाही. (क) यूनिव्हर्सिटी स्थापन झाल्यानंतर, यूरोपखंडांतील देशांचे प्राचीन व अर्वाचीन इतिहास वाचून इतिहासाविषयी स्पष्ट व उदात्त कल्पना नव्या विद्वानांना याव्या हे साहजिक होतें. (१) ह्या नवीन कल्पनांचे प्रथम फल पटले ह्मणजे निळकंठराव कीर्तने यांची ग्रांट्डफ्वरील टीका होय. कीर्तन्यांना अस्सल कागदपत्र न मिळाल्यामुळे यद्यपि त्यांनी केलेली टीका तांत्रिक आहे तत्रापि ग्रांडफच्या ग्रंथांत दोष व न्यूने आहेत हे दाखविण्यास तिचा उपयोग झाला आहे. हिंदुलोकांच्या भित्रेपणाविषयी व हिंदुस्थानांतील निरनिराळ्या राष्ट्रांच्या स्वतंत्र अस्तित्वाविषयीं या टीकाकाराचें ह्मणणे सयुक्तिक व सशास्त्र आहे. इतकेच की, ही टीका अत्यंत त्रोटक आहे. १८६७ पासून पुढें डेक्कन कॉलेजांत व कदाचित् एल्फिन्स्टन कॉलेजांत मराठ्यांच्या इतिहासाची आस्था बाळगणारी काही मंडळी निपजत चालली होती असे दिसते. (२) कीर्तन्यांच्या टीकेनंतर विविधज्ञानविस्तारांतून एक बखर, एक राजनीति व एक काशीराजाचे भाषांतर अशी तीन जुनी वाडे बाहेर पडली. (३) त्यानंतर रा. साने, मोडक, चिपळोणकर व ओक ह्यांच्या अवाढव्य (काव्य) इतिहाससंग्रहाला सुरवात झाली. (४) पुढे लवकरच प्रभू लोकांच्या इतिहासाची साधनें थोडीबहुत जगापुढे आली. (५) नंतर काही कालाने बडोदें. येथें शिवराजाच्या दोन बखरी छापल्या गेल्या. (६) पुढे भारतवर्षाला प्रारंभ झाला - (७) अलीकडे वासुदेवशास्त्री खरे ह्यांना ऐतिहासिकलेखसंग्रहाला सुरुवात केली अ ला येणेप्रमाणे साठपासष्टांत इतिहासाच्या आस्थेची जी एक लाट उसळली ती अजून झम