पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लिहीत जाईन. हे विज्ञापना. स्वामीचे आज्ञापत्र याच घटिकेस पावले. हे विज्ञापना. [१३] ॥श्री ॥ २८ सप्टेंबर १७५७. पे॥ छ १३ मोहरम बुधवार सवाप्रहर रात्र प्रारंभ. श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसीः आज्ञाधारक गणेश संभाजी सा॥ नमस्कार विनंति. ता॥ छ १३ मोहरम पावेतों स्वामीचे कृपेकरून सुखी असो. विज्ञापना एसीजेः निजामअल्लीखान याचे काल वर्तमान लिहिले होतें तें छ १२ रोजी मौजे बानगांव प॥ पिंपरी नजिक वरुड येथे मुकाम होता. आज शहरानजीक कोसावर राहणार. उदईक नवाबाच्या भिटी होणार. सेवेसी श्रुत होय. सरकारचे जासूद पत्र छ ११ रोजचे घेऊन आले तें काल संध्याकाळच्या दिडा प्रहरा दिवसा पावलें. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. [ ९४ ] ॥श्री॥ २९ सप्टेंबर १७५७. पे॥ छ १४ मोहरम गुरुवार सा घटका दिवस प्रातःकाळ. विनंति सेवक शामजी गोविंद सा॥ नमस्कार विनंति. येथील ता॥ छ १३ मोहरम बुधवार आवशीची सा घटका रात्र होती. स्वामीचे कृपादृष्टीकरून मोरगांवावर यथास्थित असे. यानंतर मुकाम मजकुरास येतांच विनंतिपत्र शिवाजी दि॥ नारोजी न।। याब॥ पाठविले आहे. पावले असेल. अलीकडे सोफीबेग अर्जबेगी नवाब सलाबतजंग येथील नवाबाकडे कांहीं पैगाम आजचा मुकाम शहरानजीकचा होता. त्यास त्यांणी सांगोन पाठविलें की