पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सुहुरसन खमसखमसैन मया व अलफ. तुझी पत्र पाठविलें प्रविष्ट जाहालें. लिहिले वृत्त अवगत जाहाले. याज उपरि जाले वर्तमान वरचेवरी लिहीत जाणे. असेंच सर्वदा कच्चें वर्तमान लिहीत जाणे. यानंतर येथून गिरमाजी व्यंकटेश व माधवराव पाठविले आहेत. हे पोहोचल्यावरी तेथे रंग कसा पडतो, काय मजकूर होतो, तो सविस्तर लिहिणे. जर तेथें जीव असला तरी काशीचा कमाविस गोपाळराव गणेश याचे तर्फेनें करणे. नाही तरी गिरमाजी व्यंकटेशाबरोबर तुझी येणे. खर्च सात हजार पडला वगैरे तपशील ओढगस्तीचा विस्तार लिहिला तरी ओढ तूर्त तशीच सोसणे. काम जाहल्यावरी सारेंच सोईस पडेल. जर काम न जाहालें तरी तुझी हुजूर येणे. मग वाजवी खर्च असेल तो दिल्हा जाईल. व तुह्मी गिरमाजी व्यंकटेश, माधवराव यास ताकीद करोन कामें सरकाराची होत तें करणे. मागाहून गोपाळरावहि येणार. आठपंधरा दिवसा हुजूर पोहोंचतील. जाणिजे. छ २७ साखर. लेखन सीमा [४८] ॥ श्रीराम ॥ ४ मा १७५५. अल्लाहू रावसाहेब मुफिक् मेहरबान् मादने खूबीहाय बेकरान् सलामत्. बादझ् इबाजे मदारिजे इतिआक् व आए दर्याफ्ते मुलाकाते फिरावां अल्लाहू रावसाहेब प्रिय मेहेरबान अमर्याद गुणाची खाण सलामत् आशीर्वाद. आपल्या सुखदायक दर्शनाची व भेटीची इच्छा फार आहे असें दर्शवून विनंति केली जाते की श्रीमंत दादासाहेबांनी सरकारांतून चारशे रुपये दरसाल