पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्तमान येथे आले आहे. आतां नवाबहि लवकरच कुच करणार आहेत. सेवेसी विदित जाले पाहिजे. छ सविसांचे रोजी रविवारी फिरंगी यांचा सण होता. फरंगी येथे आमखासांत राहतात. रविवारी प्रातःकाळी फरंगी यांनी वीस एकवीस तोफा सोडिल्या. तदनंतरें सर्व फरंगी पैठणदरवाजाबाहर बाग आहेत त्या बागांत गेले होते. तेथे आपला सण केला. नृत्यांगना नेल्या होत्या. संध्याकाळचे समयीं राजे रघुनाथदासहि नृत्य पहावयास गेले होते. तिकडून दीड प्रहर रात्रीस मोठे जुलसाने फरंगियांसहवर्तमान शहरांत आले. सवेसी विदित व्हावयाकरितां निति लिहिली आहे. दुसरी उडवार्ता ऐकिली की राजश्री मल्हारजा होळकर फौजसुद्धा झांसीसै. दाखल जाले. बहाणपुरी खजाना अटकाविला हे वर्तमान ऐकोन बहुत संतप्त आहेत. जरीदा होऊन ब-हाणपुराचे पारिपत्यास येणार ह्मणोन वर्तमान आढळले. स्वामींचे सेवेसी कासीदहि आले आहेत. आढळलें वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. सत्य मिथ्य कळत नाही. सेवेसी श्रुत जालें पाहिजे. दमाजी गाईकवाड यांचा भाऊ केदारजी ह्मणोन कोणी गुजराथेत आहे. त्याणे व बाणराव दि॥ मजकूर या दोघांनी फौजबंदी बहुत केली आहे"मणोन येथे दाट अवई आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. ३८ अंतरर्वेदातील पठाणाशी लढाई आटपून होळकर १७५१ च्या अक्टोबरांत झांशीस आले. ३९ यावरून दमाजी १७५१ च्या अक्टोबरांत कैदेतच होता व त्याचा कोणी कदोरजी नांवाचा भाऊ त्याच्याकरितां गुजराथेंत फौज जमवीत होता असे दिसते. रघुनाथ रावाच्या बरोबर दमाजीला देऊन गुजराथेंत नानासाहेबांनी कधी पाठविले ह्याचा उलगडा करणं जरूर आहे. १५ मार्च १७५१ त दमाजीचा साताऱ्याजवळ गेंच्याच्या माळावर पराभव झाला ( पत्रे व यादी १६८ ). पुढे महिन्या पंधरा दिवसांत नानासाहेब पुण्यास येऊन त्यांनी दमाजीला कैदेत ठेविलें. तो १७५१ च्या अक्टोवरांत कैदेतच होता. पुढे १७५१ च्या नोव्हेंबरांत व डिसेंबरांत पेशव्यांच्या निजामाशी कुकडी नदीवर झटापटी झाल्या व १७५२ च्या जानेवारीत तह झाला ( पत्रे व यादी १६१ ). तह झाल्यावर लवकरच रघुनाथरावदादांना गुजराथच्या स्वारीस पाठविले ( पत्रे व यादी ३५५, १६१).