जबरदस्त शत्रू बहामनी राज्यास उत्पन्न झाला होता, परंतु महंमद गवान यानें असे- रीस त्याचा पूर्ण पराजय केला, त्याच्या ताब्यांतील खेळणा किल्ला, रामगडचा किल्ला व त्याचा इतर सर्व प्रदेश हस्तगत करून घेऊन त्यास नामशेष केलें; विजयानगरकराच्या ताब्यांतील गोवें हें महत्वाचे बंदर हस्तगत करून घेतलें; आणि दाभोळ, चौल वगैरे प्रतिति या प्रदेशाची भर घालून व अशारीतीने सर्व कोकणपट्टी बहामनी राज्याच्या अमलाखाली आणून त्या प्रांताच्या बंदोबस्ताकरितां पन्हाळा येथें एका सुभेदाराची नेमणूक केली व या महत्वाच्या स्वारीत विजय मिळवून तो राजधानीत परत आला.
या विजयामुळे महंमदगवान याचा अतीशय लोकांक होऊन त्याचें महत्व परमावधीस पोहोंचलें. शहाने त्याचा विशेष बहुमान केला, आपल्या आईसह त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली; त्यास मानाच्या अनेक पदव्या अर्पण करून स्वतःच्या अंगावरील झगा काढून त्याच्या अंगावर घातला, व राजमातेनें त्यास आपला "भाऊ " या नांवानें हांक मारून त्याचा गौरव केला. महंमदशहा आपल्या आईसह राजवाड्यांत परत निघून गेल्यावर महंमद गवान आपल्या खोलीत गेला, आणि जमीनीवर अंग टाकून पुष्कळ रडला; नंतर काही वेळानें तो बाहेर आला; बेदरमधील विद्वान् व पूज्य मंडळींना बोलावून आणवून आपणाजवळील हत्ती, घोडे व ग्रंथ- संग्रह याशिवायची सर्व संपत्ती त्यानें त्या लोकांना वांटून दिली आणि ह्मणाला:- " ईश्वराला धन्यवाद असोत! मी मोहजालांतून बचावलों; त्यामुळे आतां मला कोण- त्याही प्रकारें भीति राहिली नाहीं. " त्यावेळी शमसुद्दीन या नांशच्या एका मुलानें " असें करण्याचें कारण काय ? " ह्मणून त्यास विचारिलें; तेव्हां महंमद गवान हणाला, " जेव्हां शहा माझ्या मेटीस माला, अ आणि राजमातेनें मला भाऊ " हणून हांक मारिली त्यावेळीं माझी विवेकबुद्धी नष्ट होऊन माझ्या मनांन राजमातेविषयीं पापवासना उत्पन्न झाली; त्यामुळे मला अतिशय त्रास व मानसिक दुःख झालें; ह्मणून या सर्व दुःखाचें मूळ असणारी जी संपत्ती ती सर्व मो वांटून टाकीत आहे. हत्ती व घोडे हे माझे नसून शहाचे आहेत; व माझ्याजवळील पुस्तकसंग्रह मी विद्यार्थीवर्गाच्या उपयोगाकरिता जवळ ठेविला आहे. " यादिवसापासून महंमदगवान हा नेहमी साधे व हलक्या किंमतीचे कपडे वापरून गरीबी रहात असे; राज्यकारभारांतून वेळ मिळेल त्यावेळी तो आपल्या स्वतः बांधिलेल्या मशीदीत अथवा त्याने राजधानीत बेदर येथेंच बांधलेल्या भव्य पाठशाळेत जाऊन सद्गुणी, विद्वानू व पूज्य मंडळींच्या सहवासांत आपला काळ घालवीत असे, दर शुक्रवारी वेष पालटून लोकांत दानधर्म करण्याकरितां तो शहरांत फिरत असे व " तुह्मांत शहाने दिले. आहे " असे सांगून तो गरीब लोकांना दान- धर्म करीत असे; शिवाय कोकणपट्टीवरील स्वारीनंतर महंमद गवान यानें शहास