Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७१ )

आईचें नांव माई राणी हैं असून ती मोठी हुशार, विचारी व धोरणी खी होती; व महंमदशहाच्या कारकीर्दीत बहामनी राज्याची विशेष भरभराट होण्यालाही तोच पुष्कळ - अंशी कारणीभूत झालेली होती तिने शहाचा दूधभाऊ ख्वाजा जहान व महंमद गवान या उभयतांना आपल्या मदतीस घेऊन राज्यकारभार चालविला; परंतु पुढे या उभयतां मुत्सद्यांमध्यें आपसांत स्पर्धा उत्पन्न झाली; तेव्हां माई राणीनें ख्वाजा जहान यास ठार मारून हे भांडण मिटविले; आणि महंमद गवान हा एकटाच सर्व राज्याचा - माई राणीच्या अनुमतीने कारभार पाहूं लागला.

 महंमद गवान हा “ परदेशी " असून सुनी पंथाचा होता; त्यामुळे याच्या कारकीर्दीपासून दरबारांत दक्षिणी लोकचि वजन कमी होऊन परदेशी लोकांचं महत्व परमावधीस गेले. त्याच्या स्वतःजवळ त्याने दोन हजार मोगल सैन्य खाजगी रीतीनें बाळगिलें होतें, आणि बहामनी राज्यांतील दहा हजार स्वारांच्या सैन्याचा सरदारी- ही त्यास मिळालेली होती. तथापि तो मोठा विरक्त व उदार असून अतीशय राजनिष्ठ होता. त्याची महंमदशहावर अकृत्रिम भक्ती होती; त्याच्या औदर्यांची कीर्ति सर्व अशिया खंडभर पसरली होती, आणि विद्वान् मनुष्यांना न्याच्या औदार्याचा लाभ मिळाला नाहीं असें शहरही क्वचितच आढळून येत होते. शिवाय तो विशेष सुस्वभावी व मनमिळाऊ होता, आणि त्याची न्यायपद्धतीही पूर्ण निर्दोष होती; त्याप्रमाणेच तो शूर असून अलौकीक मुत्सद्दी होता, आणि त्याच्याच कर्तृत्वामुळे राज्यांत शांतता व सुस्थिति नांदत होती.

 अल्लाउद्दीन शहाच्या कारकीर्दीत इ० सन १४५३ मध्ये खेळणा ऊर्फ विशाळगड येथील राजा शंकरराय याच्याबरोबरील युगांत बहामनी राज्यांतील बहुतेक परदेशी सैन्याचा नाश झाला, आणि शूर सरदार तुजार हाही मारला गेला; ही गोष्ट गवानच्या पूर्णपणे ध्यानांत होती; म्हणून त्यानें इ० सन १४६९ मध्ये आपणाबरोबर एक मोठं व पहाड़ी पायदळ सैन्य घेऊन तिकडे स्वारी केली, व दोन वर्षेपर्यंत कोल्हापूर येथें मुक्काम ठेवून शंकरराय व इतर राजेरजवाड्यांवर आपली मोहीम सारखी चालू ठेविली. शिक्याचें राज्य नष्ट करून इतर राजेरजवाड्यांना नामशेष केलें व शंकर- रायाविरुद्धही मोठ्या जोराने मोहीम सुरू केली. यावेळी शंकरराय हा मोठा बलाढ्य असून त्याच्या ताब्यांत खेळण्याचा मजबूत किल्ला व आसपासचा पहाडी अवघड प्रदेश असून शिवाय तीनशें जहांजाचे एक आरमार त्याच बाजवळ नेहमी सज्ज असे; व थेट समुद्रकिनान्यापर्यंत त्याचा अंमल चालत असून त्या आरमाराच्या साह्यानें तो बहामनी राज्याच्या व्यापाराला अतीशय उपसर्ग देत असे. असा हा एक