Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सरदार गंगाधरराव रघुनाथराव गंभीरराव देशमुख,
देशपांडे, सरकानगो, सावदें जिल्हा पूर्व खानदेश.

 श्रीमंत गंगाधरराव रघुनाथराव गंभीरराव, सरकानगो, देशमूख, देशपांडे, व सेकंडक्लास सरदार, सावर्दे, जिल्हा पूर्व खानदेश, आणि नेमाड, हैं, जें घराणे सहाशें पन्नास वर्षांपूर्वी, अर्जुन नाईक या नांवाच्या एका मनुष्याचा मुलगा नामें गुरूदास यानें स्थापत केले, त्या घराण्याचे वंशज आहेत. गुरूदास हा बादशहा मुधारिक यांच्या अतीशय मेहेरबानींतील असून बादशहाने त्यास खानदेश आणि नेमाड प्रांतांतील आशिरगड, सापदें, मांजरोद, वरणगांव, आणि डांगरी परगण्यांची, देशमुखी आणि देशपांडेपणाचे वतन बहाल केलें होतें. त्याच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा गंगोजी हा त्या वतनाचा मालक झाला; त्यानें मिल आणि पेंढारी यांच्या मध्यें सलोखा घडवून आणण्यांत प्रमुखत्वाने भाग घेतला, आणि बादशाही सैन्यास सामुग्री वगैरेंचा पुरवठा केला. या त्यांच्या कामगिरीबद्दल बादशहा अल्लाउद्दीन याने त्यास खानदेशांतील एकशे तेवीस गांवची जमेदारी, सरकानगोषणा, " गंभीराव " हा किताब, व सरदारकीचे सर्व मानमरातच हीं सर्वं त्यास वंशपरंपरेनें बहाल केली. त्यानंतर हलींच्या सरदार साहेबाचे आजे केशवराव गंभीरराव यांनी आपल्या प्रदेशाच्या हद्वीत " सधै-सेंटलमेंट" ह्मणजे जमीनीची मोजणी व धाराबंदीचा उपक्रम करण्यांत इंग्रज सरकाराला प्रत्येक प्रकाराची मदत केली, आणि नवीन सुधारणा सुरू करण्याच्या व पूर्वीच्या काही चाचती दुरुस्त करण्याच्या कामही साह्य केलें; ह्या गोष्टी लक्षात घेऊन या घराण्यातील हलींचे मुख्य पुरुष श्रीमंत गंगाधरराव बांस हिंदुस्थान सरकारने ३० सन १९०९ मध्यें सरदारकीचा मान अर्पण केला. हिंदुस्थान सरकारनें पूर्व खानदेश जिल्ह्यास " सरदार " ही पदवी अर्पण केल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.

 सरदार गंगाधरराव देशमूख, हे कांहीं काळ, डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाचे मेंबर, व सावदें मुनसिपालिटीचे प्रेसिडेंट अमून सावदें गांवाची सर्वसाधारण सुधारणा, आणि आरोग्य, या बाबतीत त्यांनी मोल्यवान कामगिरी बजाविली आहे; व ती सरकारासही मान्य झालेली आहे; त्याप्रमाणेच त्यांना दुसन्या वर्गाच्या मॅजिस्ट्रेटचे अधिकार देऊन सरकाराने त्यांचा बहुमान केलेला आहे. शिवाय सर्व साबदें परगण्याच्या धर्मधिकारीपणाचा अधिकारही त्यांच्याचकडे असून संकेश्वर आणि करवीर मठाच्या शंकराचार्यांनी त्यांनां नुकताच “ धेर्योदाय चूडामणी " हा किताब देऊन त्यांचा गौरव केलेला आहे.