Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंतांचें अभिनंदन.


 श्रीमंत सरदार गंगाधरराव साहेब यांच्यासंबंधीं याठिकाणीं कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणे आवश्यक आहे. श्रीमंतांचा व माझा लहान- पणापासूनचा परिचय असल्याने श्रीमंतांचा, या ग्रंथास आश्रय देण्याबद्दल मी विनंति केली; व ती त्यांनी मान्य करून, मराठ्यांच्या इतिहासाच्या पहिल्या, दुसऱ्या व ह्या तिसन्या व याच्या पुढील सर्व भागांस आपला उदार आश्रय देऊन, मला आपलें ऋणी केले आहे, इतकेच नव्हे तर श्रीमंतांच्या कृपेमुळेच हा सर्व ग्रंथ पूर्ण होणार असल्यामुळे, त्याचें श्रेय श्रीमंत सरदार गंगाधरराव साहेब यांनाच देणें इष्ट आहे.

दत्तात्रय.