Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७१)

त्याचे पूर्वेकडे कहरदय व पश्चिमेकडे महोदधी समुद्र. त्या मुलुखांत एक मोठे शहर आहे त्याचें नांव चीन तेथे मुख्य बादशाहा राहतात, त्यामुळे त्या टापूचें नांव चीन पडले. ते शहर बहुवच उत्तम आहे. हवेल्या वगैरे भूमी व भिंती चिनीचे पेल्याप्रमाणे व कांच चिलोरमय सारें. ते पाहिले असतां स्वर्ग पाहण्याची इच्छा रहात नाहीं. याचे कारण, तें पूर्वी विश्वचें स्थान तेथें पूर्वी पांडवांनी मयसभा केली होती. त्यासमई कारागीर त्या बादशाहापासून मागून आणिला होता. त्याचे नाव मयासूर. त्या टापूंवर रयत गोरे) लोक झाडून. त्यांस चिनवाले ह्मणतात. तेथें दुसरे जातीचें मनुष्य इंग्रज वगेरे कोणासच आपले बंदरात घेत नाहीत. त्याचे राज्यांत कारागिरी व कसची अतिकुशल लोक. त्यांन कसयावर पैसा उत्पन्न करीत असावा. स्था राज्यांत उत्पन्न जिन्नस होतो:- रेशीम, रेशमी सरंजाम व मातीचा जिन्नस, त्याजवर कवड्यांचें रोगण व बिलोरी सरंजाम, झुंबर, झाडें, हंड्या, फाणूस वगैरे पितळी पाने व हरजिनसी पितळी सरंजाम व कांच व आयने मोठे, घड्याळे व दुरमिणी व छत्रया व पंखे वगैरे कागदी, चंदनी व कापड चिटें वगैरे. त्यास चंदन रुई इकडून जाती, त्याची चीज करून विकतात व तसबिर व पुतळ्या, मातीच्या व लोखंडी हत्यारे व शखें व पेट्या व चर्मी सरंजाम, तयार करितात व इकडून कथील जाते त्याची चांदी करून गट बांधून त्याजवर छापे करून देतात, ते इकडील बेपारी घेऊन येतात. याप्रमाणे हरत-हेने उत्पन्न करून इतर टापूंचा पैसा ओढतात. जिन्नस देऊन पैसा घ्यावा, परंतु सो जिन्नस जाया जाहला असतां त्याचें कांहीं उत्पन्न होऊं नये. चहूंकडील बेगरी जहाजे घेऊन जातात. त्यांनी वीस कोसांपलीकडे रहावें. आपले बंदरास जहाज ठेवू देत नाहीत, परस्परे दलाल यांनी सवदा करून मचये भरून नेऊन द्यावे, आणावे. इंमजांचा बेपारी कोणी आला, तर त्याने पन्नात कोसांपलीकडे असावें, इंज लोक कोणी त्या टापूंवर जाऊ' पावत नाहीं. इकडून जहाजे महोदधतून पूर्वेस चिनीच्या बंदरास तीस दिवसांत जाते. द्वारकेकडून कलकस्यास जाणे, तर इकडून रत्नाकर समुद्रांतून श्रीनगर, कोची बंदराकडून दक्षिणेस जाऊन, लंका व रामेम्बर डावा घालून,मंदरास ह्याणजे चेनापट्टण व मच्छलीबंदर महोदधी समुद्रांत उत्तरेकडे शिरून, जगन्नाथ व बंगाल डाव टाकून कलकश्यास जावें. तसेच इकडे येणें तर, महोदर्धीतून कलकस्य हून गंगासागर व जगन्नाथ व चिनाग उजवे टाकून कहर दय यांत जाऊन लंका व रामेश्वर उजवा टाकून रत्नाकरांत शिरून, इकडे अगर अवस्थानांत अथवा मक्कधाकडे पाहिजे तिकडे जावें; आणि रूमाच्या राज्यांत जाणें तर मक्कचाकडे खुबकीवर उतरून जावयास बहुत दिवस लागतात. सबब लंकेचे पलीकडुन कट्टर दर्या यांत शिरून, फरासी साचा टापू व अर्थस्थान उजवें टाकून, कहर दर्या यांतून शेपन्नास कोसविरून पाण्यांतून