Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२६६)

 अवरंगजेब ३० सन १७०७ मध्ये मृत्यू पावल, पण त्याच्या पूर्वीच मंगल राष्ट्राचा अत्यंत झपाट्यानें -हास होत चालला आहे, ही गोष्ट इंग्रज कंपनीच्या ध्यानति भाली होती; आणि या संधीचा फायदा घेण्याविषयीं त्यांचे सारखे प्रयत्न सुरू होते, लंडन येथील उपवस्थापक मंडळाने मद्रास - फोर्ट सेंट जार्ज येथे आपल्या प्रतिनिधीला ता० १२. दिजंबर ३० सन १६८७ रोजी एक पत्र पाठविलें, त्यांत त्यांनी असें लिहिले आहे की, "डच लोकांप्रमाणेच दिवाणी व लष्करी सत्ता आपणही स्थापन


त्याबद्दल खालीलप्रमाणे फर्मान - जकातीच्या माफीचें मोंगल बादशहाकडून है, पहिलेच फर्मान आहे.- काढिलें; तें-सुरत येथे इंग्रज लोकांनी पसारी घातल्या त्यावेळेपासून कधीं साडेतीन, कधी तीन व कधी अडीच टक्के, याप्रमाणे निरनिराळ्या बादशहांनी निरनिराळी जकात त्यांच्या- वर बसविली होती; स्थानिक अंमलदारांच्या जाचामुळे इंग्रजांनी सुरत येथील वखारी, आज तीन वर्षे बंद केल्या आहेत. बहार आणि ओरिसा प्रांतांत त्यांना जकात यावी लागत नाही; बंगालमध्ये ते तीन हजारांची रक्कम दरसाल उकती देत असतात, भिन्न असला प्रकार बंद करून आपणांपासून एक ठरीव रक्कम घेऊन, सर्व राज्यांत सरसकट एक कायदा ठरवावा, अशी इंग्रजांची मागणी आहे. सबब असे ठरविण्यांत येतें कीं, सुरत येथे इंग्रजांपासून दहाहजार रुपये पेषकष ह्मणून घ्यावें, आणि त्यांस वाटेल तिकडे काहीं एक जकात न भरितो व्यापार करण्याची पूर्ण मोकळीक असावी. नवीन वखारी घालण्यास व मालाची खरेदी विक्री करण्यास त्यांत आमच्या अधिकन्यांनी मदत करावी; चोरी झाल्यास चोरांस पकडून शिक्षा करावी; व चोरीस गेलेला माल त्यांस परत देववावा देण्याघेण्याच्या व्यवहारांत त्यांस कोणी त्रास न देतां योग्य व्यवहार घडला असेल, तसा निकाल करावा; विनाकारण जाच करूं नये. फरमानाची एकच प्रत_ स्पांजवळ असल्यामुळे त्याच्या नकला निरनिराळ्या ठिकाणी ते दाखवितील त्या आमच्या अधिकान्यांनी मान्य कराया. इंग्रजांपैकी कोणी कांही आगळीक केल्यास जिला परभारें शिक्षा न करितां, त्या ठिकाणच्या मुख्य इंग्रज अधिकाऱ्याकडे त्यास शिक्षसाठी पाठवून द्यावे. त्यास नवीन पखार घालावयाची असेल तेव्हां चाळीस विधे जागा मोफत यावी. ( ता० ६ जानेवारी इ. सन १७१७ ) या बाबतीत लोक- हिनवादी रुत राजस्थानचा इतिहास पान २७०-२७१ मध्ये असे लिहिले आहे कीं, " हा सर्व आनंदाचा दिवस ज्या इंग्रजी डाकराचे उपायाने व मेहनतीने दिसला त्या डाकराने ह्यामिल्टन यानें- बादशहाची मर्जी खुष करून घेऊन, आपल्या व्यापारी मंड- ळीचे कल्याण करून घेतलें. असें कल्याण आजपर्यंत कधींच कोणी करून घेतलें. नव्ह व त्याकरितांच इंग्रजी व्यापारी कंपनी दिल्ली दरबारति अर्जावर अर्ज देऊन