Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६५ )

पाई लागले, त्याबद्दल पुष्कळ तक्रारी झाल्या. इंग्रजांनीं आपलें चांदीसोनें मोंगलांच्या टकसाळीत पाठवून तेथें त्यांची नाणी पाडून घ्यावी, अशाच मोंगल अधिकान्यांनीं पुष्कळ वेळा इंमजांस सांगितलें, पण इंग्रजांनी आपल्या टांकसाळीत नाणी पाडण्याचें काम बंद केलें नाहीं. इंपज लोक मॉगल नाण्याची हुबेहुब नक्कल करीत असल्यामुळे इंग्रजांनी पाडलेली नाणी कोणती, व मोंगलांची कोणती हे कळण्यास आज मार्ग नाहीं. मात्र इंग्रजांची नक्कल वजनाने व किंमतीनें मोगलनाण्याशी तंतोतंत मिळती असल्यामुळे, इंग्रजांची नाणी सर्व ठिकाणी निर्बंध चालत. हा घोटाळा बंद करितां येईना; तेव्हां इ० सन १७१७ त फर्रुखसेयर बादशहाने इंग्रजांस मुंबईत मोंगलांची नाणी पाडण्याचें उचड फर्मान दिले. हा नाण्यांचा इतिहास भोंगल ब. दशाहीच्या हासाचा चांगला निदर्शक आहे. इ० सन १७५९ त इंग्रजांनीं कलकल्यास आपली टांकसाळ घातली; सन १७६५ त इंग्रजांस बंगालची दिवाणी मिळाल्यापासून त्यांचा हा नाण्यांचा उद्योग राजरोस सुरू झाला; तथापि पुढे काही दिवस बंगालचा नवाब व इंग्रज अशा दोघांचीं नाणी सुरू होती. सन १७९३ त इंग्रजांनीं नचाचाचीं व यादशाहाची नाणी बंद करून आपला रुपया चालू केला; पण ही व्यवस्था सन १८३५ त कायमची अमलांत आली. ( Lane Pool's Coins. ) "


 टीप १: - फर्रुवसेयर ( कारकीर्द इ० सन १७१३ ते ३० सन १७१९ ) यास सय्यद बंधूंच्या मदतीनें राज्यप्राप्ति झाल्यानंतर दोनच वर्षांनीं ह्मणजे इ० सन १७१५ मध्ये आपल्या व्यापाराची नीट व्यवस्था लावून घेण्याकारतां जान सर मन व कोगी सर होद हे दोन वकील कलकतेकर इंग्रजांनी दिल्लीस बादशहाकडे पाठविले. याचवेळी बादशहास काळपुळी होऊन जबर दुखणं लागले होते, व सर्व वैद्यांचे उपाय थकले होते. अशावेळी या वकिलाबरोबर हॅमिल्टन या नांवाचा एक वकील होता, त्यानें शस्त्रप्रयोग करून बादशहास बरें केलें व या आजारीपणामुळे त्याचें अजीत सिंहाच्या मुलीशी ठरलेले लम खोळंबून राहिलें होते, तेही नंतर निर्विघ्नपणे पार पडलें.

 फर्रुखसेयर बरा झाल्यावर, त्यानें हॅमिल्टन यास विचारिलें कीं, तुझीं मला या असाध्य दुखण्यांतून बरे केलें, याबद्दल तुह्मास काय बक्षीस द्यावें ! हा शस्त्रय मोठा स्वदेशाभिमानी असल्यामुळे त्याने आत्महितापेक्षां स्वदेशहिताकडे विशेष लक्ष देऊन सांगितलें कीं, " मला स्वतःला ह्मणून काहीं नको, परंतु आमच्या व्यापारी मंडळीचा व्यापार आपल्या सर्व राज्यांत अप्रतिबद्ध व करदस्तुरी वगैरे न घेता चालण्या- बद्दल बादशाही फमीन मिळावें, एवढाच अर्ज आहे, " त्यावरून बादशहाने मोंगल राज्यति इंग्रजांना काही ठरीव अटींवर जकातीची माफी कायमची करून देऊन,
३४