इ० सन १६१६ रोजी बादशहाशी प्रथम भेट झाली; एक वर्षभर हिंदुस्थानात
संहिल्यावर त्याने विलापतेस असे कळविले की, व्यापारासंबंधाने आपल्या इच्छा सफळ
होण्यास अडचण नाहीं; तथापि बादशहाशी बरोबरीच्या नात्याने कायमचा तह होणे
मात्र शक्य नाहीं; मोंगलास मदत करणे किंवा तटबंदी करून किनान्याचे संरक्षण
करणे असले बेत निरुपयोगी आहेत. व्यापार व युद्ध या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध
आहेत; समुद्रावर शांतपणे व्यापार करून मिळेल तोच नफा मिळविण्याचा आपण आपल्या मनांत हेतु देविला पाहिजे;" त्यानंतर इ० सन १६१८ च्या फेब्रुवारी महिन्यांत रो यानें विलायतेस आपला वार्षिक अहवाल लिहून पाठविला त्यांत तो ह्मणतो:- - कायमचा तह होणें केव्हांही शक्य नाहीं, प्रसंग पडेल तसे आपण वागले पाहिजे, जरूर तेवढी फर्मानें मिळाली आहेत; काही मिळावयाची आहेत. बादशहाची मर्जी हाच केवळ कायदा
असून सर्व दरबारी व्यवहार पैशावर चालत आहेत. एकंदरीत लोकांस न्यारा
मिळतो, सरकारी अधिका-यांचा लोकांवर जुलूम नाही; परंतु त्यांना पाहिजे असेल तो
जिन्नस मात्र ते हवें तें करून लुबाडून घेतील, आह्मांस त्रास पडतो तो आमच्याच
अभ्यवस्थेमुळे; ह्या लोकांश गरीचीने वागून उपयोगी नाही, त्यांस आमचा कंटाळा
आहे. त्यांची बंदर सधन होती; ती आह्मीं मिकेस लावून त्यांचा सर्व व्यापार बुडविला
आहे, आमची जरच त्यांच्यावर जितकी बसेल, तितकें आपले काम होत जाईल.
या लोकांस तरवारीच्या धारेखालीं ठेविले पाहिजे. जर आमच्या मागण्या अधिका
कबूल केल्या नाहीत, तर बेलाशक एतद्देशीय व्यापा-यांची गलबतें पकडून आह्नीं
आपले काम भागवायें " रो हा बादशाही दरवरांत कांहींकाळ राहिल्यानंतर त्याच्या
मध्यस्थीनें इंग्लंडचा जेम्स राजा व जहाँगीर बादशहा यांच्यामध्ये तह ठरला; परंतु
दरबारी लोकांच्या धूर्तपणामुळे त्या तहावर बादशहाची सही झाली नाहीं; तथापि
शहाजाद्याच्या मध्यस्थीने इंग्रजास सुरतेस राहण्याची, देशांत व्यापाराकरितां प्रवास
करण्याची हत्यारे वापरण्याची व मोंगल दरबाराबरोबर इंग्रज वकील ठेवण्याची
धगैरे सवलती से यानें बादशहाकडून मिळविल्या; शिवाय, "इंग्रज व्यापाऱ्यांचा
आपण चांगला परामर्ष घेऊं" अशा अभिवचनाचें एक पत्र त्यानें जहांगीर बादशहा-
जवळून जेम्स राजास घेतले; व ता• १९ फेब्रुवारी इ० सन १६१९ रोजी तो
हिंदुस्थानांतून इंग्लंडमध्ये परत गेला; एकंदरीत सर टॉमस रो हा मोठा हुपार व विद्वान्
मनुष्य असून, त्याच्या वकिलातीचा इंग्रजांना अतीशय फायदा झाला, असें लगणे
अतिशयोक्कांचे होणार नाहीं.
हिंदुस्थानांत इंग्रज, पोर्तुगीज व डच या युरोपियन लोकांची व्यापारीस्पर्धा,
आपसांत नेहमीं सुरू असे; इ० सन १५९७ ते इ० सन १६०० यांचे दरम्यान उच
33