Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५६ )

देशाशी व्यापार करण्याकरिता पुढे आले होते; ६० सन १६०२ मध्ये त्यांची " युनि- व्हर्सल ईस्ट इंडिया कंपनी " स्थापन झाली होती; आणि तिनेही आपल्या व्यापा सुरवात केली होती; या कंपनीतही सर्व प्रांतांचे भांडवल असून तिलाही पुष्कळ विशिष्ट अधिकार व सवलती देण्यांत आल्या होत्या व मसाल्याच्या बेटांतून व हिंदुस्थानच्या किनान्यावरून पोर्तुगीज लोकांना हाकलून देऊन तिकडे आपल्या वसाहती स्थापन कराव्या, आणि पूर्वेकडील व्यापार आपल्या एकट्याच्याच हाती ठेवावा, असा डच सरकारार्ने तिला हुकूम दिला होता. त्यामुळे त्यांनी ३० सन १६०२ मध्येच बंटामजवळ पोर्तु- गीज लोकांचा पराभव केला; मसाल्याच्या बेटांत जाण्यायेण्याला असलेली प्रतिबंधक आडकाठी नाहींशी करून तो मार्ग मोकळा केला; इ० सन १६०३ मध्ये गोव्याला इ. सन १६०६ मध्ये लिसचनला शह दिला आणि जिबालटरच्या आखातांत सॅनिश आरमाराचाही नाश केला; पूर्वसमुद्रांतील मोलक्का बेटे आपल्या हस्तगत करून घेतली. थेट जपान देशापर्यंत आपले व्यापारी वर्चस्व प्रस्थापित करून आपल्या ताब्यांतील मसाल्यांच्या बेटांत इतर कोणाचाही प्रवेश न होऊं देण्याबद्दल त्यांनी अतीशय खबरदारी घेतली; आणि पोर्तुगीज लोकांचे व्यापारी वर्चश्व-इंग्रजांची मदतही प्रसंग घेऊन- त्यांनी नामशेष करून टाकिले; परंतु त्यामुळे पोर्तुगीज लोकांऐवजी डच लोक इंग्रजास प्रतिस्पर्धी झाले; आणि त्यांनी इंग्रज कंपनीच्या मलाका सामुद्रधुनीच्या पलीकडे पूर्व आशियांतील समुद्रांतील व्यापारी दुळगवळणाला इनके अडथळे आणिले, आणि इतक्या भानगडी उपस्थित केल्या कीं, त्या देशातील पुष्कळ ठाणी इंग्रज कंपनीने सोडून दिलीं, आणि दिवसानुदिवस हिंदुस्थानच्या किनान्यावर व लगतच्या प्रदेशामध्ये त्यांन आपल्या व्यापाराचा ओघ वळवीत आणिला आणि पुढें मोल्यूकसमधील अंबोयना बेटमध्ये असलेल्या बहुतेक सर्व इंग्रज लोकांची, डच लोकांचीं, क्रूरपणानें कत्तल उडविल्यानंतर ( इ० सन १६२३ ) तर इंग्रज लोक निःसंशय पूर्णपणे हिंदुस्थानाकडे वळले; व याच देशांत त्यांनी पहिल्याने व्यापारी व नंतर राजकीय श्रेष्ठत्व मिळविलें.

 हिंदुस्थानांत मोंगल चाशहाच्या फर्मानाअन्वयें, इंग्रज लोकांनी ६० सन १६१२ मध्ये सुरत येथे आपली पहिली वखार स्थापन केली; त्यानंतर ३० सन १६१५ मध्ये इंग्लंडचा राजा जेम्स याच्याकडून सर टॉमस रो या नांवाचा एक वकील जहांगीर बादशहाच्या दरबारी जाण्याकरितां, हिंदुस्थानांतील पश्चिम किनान्यावरील सुरत बंदरात उतरला, तेथून चहाणपूर येथे जाऊन शहाजादा पक्ष याची भेट घेतली व तेथून एक महि- म्यानें ता० २३ दिजंबर इ० सन १६१५ रोजी तो अजमीर येथे पोहोंचला; चादशहा जहांगीर यांचा मुक्काम त्यावेळी अजमीर येथेंच असून, रोची ता० १० जानेवारी