भाग केले होते; त्यांपैकी पहिला ह्मणजे उत्तरेकडील भाग असून त्याची हद्व कल्याण भिवंडीपासून नागोठण्यापर्यंत होती; व त्यावर त्यानें मोलाना अहमद या नांवाच्या एका मुसलमान अधिकान्याची नेमणूक केलेली असून त्याचे राहण्याचे मुख्य ठिकाण कल्याण में होते व त्यास " कल्याणप्रांत " किंवा " कल्याणी प्रांत अशी संज्ञा होती, व दुसरा गजे दक्षिणेकडील भाग असून त्याची हद्व नागोठण्यांपासून सावित्री नदीच्या मुखापर्यंत होती व त्यावर सिद्दी अंबर या नांवाच्या एका हबशी सरदाराची नेमणूक केलेली असून त्याच्या ताब्यांत आरमारची सर्व व्यवस्था सोपविलेली होती; व त्याचें राहण्याचे मुख्य ठिकाण जंजिरा हॅ होते. कल्याणी प्रांताप्रमाणेच ह्या प्रदेशांत ही, महाडपासून उत्तरेस सोळा मैलांवर असलेल्या रायरी ऊर्फ रायगडसारखे अनेक मजबूत किल्ले असून, त्यांच्या बंदोबस्ताकरितां अदिलशाही राज्यातर्फे मराठा शिबंदी त्याठिकाणी ठेवण्यांत आली होती.
शिद्दी अंबर हा इ० सन १६२१ मध्यें - हा प्रदेश निजामशाही अमलाखाली आल्यावेळेपासून-जंजिराप्रांताचा अधिकारी होता; पुढे इ० सन १६३६ मध्ये हा प्रदेश विजापूरकरांच्या ताब्यांत आल्यावर, अदिलशहानेही त्यास तेथील अधिकारी म्हणून कायम ठेविलें, तो इ० सन १६४२ मध्ये मृत्यू पावल'; व सीदी यूसफूलान याने इ० सन १६४८ पर्यंत तेथील कारभार पाहिला; परंतु तो विशेष कर्तृत्ववान नव्हता, त्यास त्याचा मुलगा फत्तेखान यानें इ० सन १६४८ मध्ये पदभ्रष्ट केले; व तो जंजिरा येथील अधिकारी झाला; तो मोठा शुर व कर्तृवानू होता; आणि इ० सन १६६९ मध्ये ह्मणजे ज्यावेळी विजापूरकर सरदार अफजलखान हा एका मोठ्या जोरदार अदिलशाही सैन्यासह शिवाजीवर चाल करून जात होता, त्यावेळी, त्या संधीचा फायदा घेऊन फत्तेखानाने तळें व घोसाळे येथील किल्ल्यांस वेढा दिला होता; परंतु अफझलखानाचा व व अदिलशाही सैन्याचा शिवाजीनें नाश केला, असें कळल्यावर तो आपला वेढा उठवून मोठ्या लगबगीनें जंजिरा येथे परत गेला, तथापि पुन्हां लोकरच, लगजे इ० सन १६६० मध्ये दुसन्या अली अदिलशहाने शिद्दी जौहर ऊर्फ सलाबतजंग, व अफझल - खानाचा मुलगा फाजल महंमद यांना शिवाजीवर पाठविले व त्यांनी शिवाजी पन्हाळा किल्ल्यावर आहे असें पाहून त्यास वेढा दिला त्यावेळी फत्तेखानाने पुन्हा शिवाजीच्या
टीप १: - नागोठणें हैं कुलाबा जिल्ह्यांत पेण तालुक्यांत, पेणपासून १५ मैलांवर दक्षिणेस, आणि मुंबई पासून ४० मैलांवर नैऋत्येस असून तेथून महाबळेश्वर पर्यंत ७० मैलांबी उत्तम सडक आहे, आणि दुसरीही एक अशीच सड़क असून ती बोरघाटाच्या पायथ्याशी मुंबई - पुणे सडकेस मिळालेली आहे.
२९