Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२४)

लोकांस हबशी अथवा सिदी असे ह्मणतात, ते लोक- आफ्रिका खंडांतून हिंदुस्थानच्या पश्चिमभागांत आले; आणि चौल, रेवदंडा व दाभोळे वगैरे बंदरात उतरून बहामनी राज्यांत नौकरीस राहिले व त्या राज्यांतील " परदेशी " पक्षांत या लोकांचा पुष्कळ भरणा झाला. हे लोक दर्यावर्दी कामांत व त्याप्रमाणेच शिपाईगिरींत निष्णात असत. प्रसिद्ध मलिकंबर हाही यांच्यापैकींच असून तो तर अलोकिक योद्धा व असामान्य मुत्सद्दी ह्मणून प्रसिद्धीस आला. " हबशी " हें नांव, " आरब-ए-हॉयेश " Arab-el- Habish " यावरून पडलेले असून, त्यांना " तिदी 66 अथवा सिद्धी" असें ह्मणतात व तो " सय्यद " या शब्दाचा अपभ्रंश आहे. बहामनी राज्यानंतर निजामशाही अमलाखाली हा प्रदेश गेला; बहामनी राज्य जिवंत असतां गो येथील बहामनी अधिकान्याजवळ सिंदी याकूत या नांवाचा एक आरमारावरील सरदार होता; त्याच्याकडेस निजामशाहीचा संस्थापक अहमद निजाम-उल-मुल्क याने दंडाराजपुरी व जंजिरा येथील कारभार सोपविला होता; व यावेळेपासून निजामशाही आरमार जंजिरा येथें हबशी सरदारांच्या देखरेखीखालीं राहूं लागले होते. है आरमार मक्का येथे जाणान्या व तेथून परत येणान्या यात्रेकरूंची ने आण करीत असे; आणि इराण, अरबस्थान, आफ्रिका बगैरे देशांबरोबर जलमार्गाने चालणान्या महत्वाच्या व्यापारावर तो बिनधोक चालावा ह्मणून देखरेख ठेवत असे. ह्या हवशी सरदारांनी जंजिरा येथील खाडीच्या मुखाश खडकावर इ० सन १५७१ मध्ये एक मोठा मजबूत किल्ला बांधिला; याच बळकट व मान्याच्या किल्ल्याच्या जोरावर व हबशी सरदारांच्या जुदीच्या बळावर ( Confederacy) यांनी मराठेशाहीच्या अखेरीपर्चेत मराठ्यांचे, जंजिरा हस्तगत करून घेण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ करून टाकिले; मध्यंतरी या प्रदेशापैकी चौल-रेवदंडा है प्रसिद्ध बंदर पोर्तुगीज लोकांनी हस्तगत करून घेऊन तेथे आपले आरमारी ठाणे बसविलें. पुढे इ० सन १६०० मध्ये अकबरानें निजामशाहीवर स्वारी केली, तेव्हां तो प्रदेश – मलिकंबर पुन्हां लवकरच हस्तगत करून घेईपर्यंत तात्पुरता मोगली अमलाखाली गेला होता. पुढे शहाजहान पार्ने, निजामशाही राज्य बुडविल्यावर तो प्रदेश काल शहाजीकडे, काहींकाल मोगलांकडे व अखेरीस, इ० सन १६३६ च्या तहाअन्वये विजापूरकराकडे आला. आदिलशहाने या प्रदेशाचे दोन


 टीप १:-अलिबाग व आसपासच्या प्रदेशास अष्टागर झणजे आठ गांवचा समुदाय असे ह्मणतात स्त्रांत चौल है गरि विशेष प्रसिद्ध असून ते " चौल- रेवदंडा या नांवानेही ओळखले जा हीं दोन्हीं गांव कुलाचा जिल्ह्यांत असून, दाभोळ हे रत्नागिरी जिल्ह्यांत आहे.