दरबाराच्याच आश्रयास राहून मान्यतेस पावला व अवरंगझेबाकडून त्यानें " राजे " हा किताब व मोर्चेलांचा मान मिळविला; त्यावेळेपासून छत्रपति राजारामाच्या कारकीर्दीत मोगलांनी चंदी येथे दिलेल्या प्रसिद्ध वेढ्यापर्यंत व वेढ्यांतही नागोजी हा मोंगलातर्फे मराठ्यांविरुद्ध युद्ध करीत होता; परंतु राजारामानें खटपट करून त्यास आपल्या पक्षांत "ओढून घेतले; आणि नागोजी माने यानेही स्वदेशाचा अभिमान बाळगून, स्वराज्याची चाड मनात आणून स्वार्थात आळा घालून, बादशाही मायामोहाची सरदारी झुगारून देऊन स्वदेशकार्य करितां कीर्तिसाठी, महाराष्ट्रधर्म राखण्याला मदत करण्याच्या भावनेने मराठी राखिल्यास नीट; नाहीं तर आज बुडतो. तुझी मराठी धर्माचे अगत्यवादी; त्यापली तुर्ली आह्मांकडे यावे. तुझीं आह्मीं एक झाल्यास ही फौज मोडून हिंदूधर्म जतन करूँ. ही राजाराम महाराजांची कळकळीची राष्ट्रीय विनंति मान्य करून मराठ्यांच्या पक्षाला मिळून मोठी अमोल्य मदन केली. प्रशंसनीय कामगिरी बजाविली; आणि " नागोजीनें आज राज्य जतन केलें. " असें राजाराम महाराजानें ह्मणून त्यास सत्तावीस महालांचीं सरदेशमुखीचीं वतनपत्रे, शिवाय दोन चार इनाम गवि व एक अभयपत्र देऊन त्याचा सन्मान केला त्यास पांच हजारी सरदारकी दिली. नागोजी माने याच्यासंबंधी, वं. या घराण्यासंबंधी' पुढें - राजाराम महाराजांच्या कारकीर्दीतील हकीकतीत येणार असल्यामुळे त्यासंबंधी याठिकाणी अधीक उल्लेख केला नाहीं.
टीप १:- या घराण्याचे " माने "हें उपनांव कसे पडलें याबद्दल हास- वडेकर माने यांच्या बसरविरून असे कळतें कीं, माने घराण्याचें मूळचें उपनांव हे होते. ते आपणास "अंदारकरराजे "असें झणवीत असत. या घराण्याचा मूळ " पुरुष अंताजी या नांवाचा होता. अंताजीस सात पुत्र होते, त्यांपैकी कृष्णाजी हा 'आपल्या इतर सर्व बंधूंबरोबर नेहमी मांडत असे; त्यामुळे त्यास वडिलांनी घरांतून निघून जाण्यास सांगितलें; त्याप्रमाणे कृष्णाजी घराबाहेर पडला; व बेदर शहरी जाऊन बादशहाकडे आपली "दाद लावून घेण्याची खटपट करूं लागला. सुमारें एक मासपर्यंत त्यांची दाद लागली नाही. कृष्णाजीस घोष्याच्या रोगांची चांगली परिक्षा असूम त्यावर उत्तम प्रकारची रामबाण औषधेही त्यास माहीत होतीं व हें ज्ञान त्याची दाद 'बादशहाकडे लागण्याच्या कामी उपयोगी पडलें.
एके दिवशी बादशहाचा एक उत्तम आवडता घोडा अतिशय आजारी पडला; व तो बरेच उपाय केले असतांनाही बरा होईना; तेव्हां बादशहास बरीच चिंता लागली. ही बातमी रुष्णाजीस समजली, तेव्हां बादशहाजवळ आपली दाद लागण्याची ही उत्तम