सती गेली, त्यानंतरही सातारकर छत्रपती भोंसले व मोहिते या घराण्याचे अनेकवेळ शरीरसंबंध झालेले असून हैं घराणेही शिर्के, निंबाळकर वगैरे घराण्याप्रमाणें प्राचीन व उच्चप्रतीचे ह्मणून गणले गेलेले आहे.
४ डफळे :- हे जत परगण्याचे देशमूख असून डफळापूर येथील पाटिलको वंश-. परंपरें या घराण्याकडे होती ह्मणून त्यास " डफळे हें उपनांव प्राप्त झालें. जत हैं त्याच संस्था- नच्या राजधानीचे ठिकाण असून ते विजापूरपासून ४० व सातारा येथून अमेयस १०० मैलांवर असून डफळापूर हे जतपासून तेरा मैलांवर आहे. या डफळे घराण्याचें मूळचें उपनांव 33 चव्हाण हैं असून विजापूर दरबारांत त्यास मनसच होती. जत येथे डफळे घराणे आजतागायत अस्तित्वात असून प्रसिद्ध आहे.
५ माने:- हे घराणेही प्राचीन असून या घराण्याचा मूळपुरूष पाठकोजी हा हसवड येथील देशमुखी करीत होता. तो दुर्गादेवीचा दुष्काळ संपल्यावर हासवड प्रांताच चंदोबस्त करीत असतां महादू या नांवाच्या एका बेरडाकडून ठार मारला गेला. त्याचा मुलगा सिदोजी हाही मोठा शूर निपजून हासवड महालाच्या बंदोबस्तावर आलेला आदिलशाही अधिकारी सुजातामिया यास त्याने आपल्या पराक्रमानें संतुष्ट केले; तेव्हां सुजात मियानें ' सिदोजी महाप्रतापी आहे, त्यानें एकांगी करून चार पांच लढाया जिंकल्या व आपल्या प्रांतावरील परचक्र नाहींसें केलें, त्याची देशगत त्यास देऊन त्याची हुकमत वाढवावी " अशी त्याची आदिलशाही दरबारांत शिफारस लिहून पाठविली, त्यावरून इबाहीम- शहा यानें त्यास भेटीस बोलावून त्याचा सत्कार करून त्यास तीनशे होनांची दरमहा तैनात चालू केली. पुढे बेदरकराविरुद्धच्या युद्धात त्यानें पराक्रम गाजविल्यामुळे आदिलशहानें " बाजी. व त्याचा विश्वासू सायकर्ता नरसिंहपंत केसकर यास विश्वासराव असे किताब दिले. त्याप्रमार्गेच सिदोजीनें पुढे बदामीचा किल्लाही सर करून घेतला, त्यामुळे त्याची विशेषच ख्याती झाली. त्यास चिलोजी व नरसिंहराव असे दोन मुलगे होते. त्यापैकी नरसिंहरावास पांच मुलगे होते; त्यांपैकी स्थाजी हा आदिलशाहीतील मोठा नामांकित व शूर सरदार असून त्या दरबारांत त्याचें अतीशय वर्चस्व होते; परंतु पुढे त्याच्यासंबंधी दरबारांत अतीशय मत्सर उत्पन्न झाल्यामुळे तो मोगली सैन्यास मिळाला; आणि मोगल सरदार राजा जयसिंह यास तो दक्षिणेत आल्यावर स्थाजी व त्याचा मुलगा नागोजी या उमयतांनीही अतीशय मदत केली; त्यामुळे त्यानें व सरदार सय्यद एखलास सर्जेखान यानें, अवरंगझेब बादश- हाजवळ स्थाजीची फार तारीफ केली. त्यावरून बादशहानें संतुष्ट होऊन रथाजी यास ह्रासवड, दहीगांव, अकलूज, मालवणी, कासेगांव, ब्रह्मपुरी, सांगोले, आटपाडी, नाझरे, बेलापूर या गांवांचे देशमुखी वतन दिलें. रथाजीच्या मृत्यूनंतर नागोजी हाही मोंगल