Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११६ )

 शहाजादा मुराइ याच्याशी चांदबिबीनें तह केल्याअन्वयें वन्हाडप्रति मोंगलांना देण्यात आला होता, परंतु वन्हाडांनच घेऊन स्वस्थ न बसतां त्यांनी अतिक्रमण करून निजामशाही अमलाखालील पात्री वगैरे शहरें लुटून फस्त केली; तेव्हा चांदबिबीनें मग लोकांशी युद्ध करण्याकरितां विजापूर व गोवळकोंडे येथील राजाची मदत मागितली. त्याप्रमाणे विजापूरकरातर्फे सोइलखान व गोवळकोंडे येथून महंमद कुली सुलतान हे सैन्यासह तिच्या मदतीस आले. आणि त्यांचे सैन्य व निजामशाहीचें वसि हजार सैन्य, मिळून एकंदर साठ हजार सैन्य मोगल सैन्याशी सामना देण्याकरितां वन्हाडकडे चाल करून निघून गेलें.

 यावेळी शहाजादा मुराद हा शहापूर येथें असून मोंगल सेनापती खानखानान हा जालना येथे होता. त्यानें शहाजादा मुगद याची भेट घेतली; आपली सर्व फोज एकत्र केली; खानदेशचा सुलतान अलीखान व राजा जगन्नाथ यांची मदत मिळवून व त्यांना बरोबर घेऊन तो स्वसैन्यानिशीं या त्रिवर्गाच्या एकत्र झालेल्या सैन्याबरोबर युद्ध करण्यास पुढे चाल करून आला व या उभयतां सैन्यामध्यें गोदावरी नदीच्या काठी सोनपत ( अथवा सुर्वे सोनपत ) येथें ता० २६ जानेवारी ४० सन १५९७ रोजी मोठ्या निकराचे युद्ध झाले, त्यांत अलीखान व राजा जगन्नाथ हे उभयताही मारले गेले; व मोंगलांचे पुष्कळ नुकसान झाले; तथापि अखेरीस त्यांनाच विजयप्राप्ती झाली. निजामशाही 1. कुत्बशाही फौजा अगोदरच समरभूमि सोडून निघून गेल्या होत्या; तथापि माँगलसेनापती खानखानान याच्याप्रमाणेच अदिलशाही सरदार सोहलखान यानें आपल्या पराक्रमाची शिकस्त केली व मॉगलफौजेवर तोफांचा सारखा येलगार केला; परंतु अखेरीस त्याचा पराभव होऊन त्यास शहादुर्ग येथे माघार घेऊन निघून जाणे भाग पडले; व मॉगलसेन्यास या त्रिवर्गाच्या एकत्र झालेल्या सैन्यावर निर्णयात्मक विजय प्राप्त झाला.

 परंतु त्यानंतर लागलीच शहाजादा व सेनापती या उमतांमध्ये मतभेद उत्पन्न झाला. शहाजादा मुराद याचें असें मत होतें कीं, आपण तात्काळ नगरच्या किल्ल्यास वेढा यावा, उलटपक्षी सेनापती खानखानाने याचें असें ह्मणणे होते की, बन्हाडमधील


 टीप:- खानखानान हा अकबराचा प्रसिद्ध वजीर बहूरामखान याचा मुलगा असून त्याचें मूळचें नांव मिर्झा अब्दुर्रहीन है होते; अकबराने बहूगमखानास " खान- झणजे श्रेष्ठांतील श्रेष्ठ, असा किताब दिला होता, तोच त्यानें त्याच्या या मुलास दिला व त्यावेळेपासून त्याचें मिर्झाखान हें नांव मार्गे पडून खानखानान या नांवानें तो ओळखला जाऊं लागला. हा अकबराचा कांहीं दिवस वजीर असून इतरही • अधकाराची व महत्वाचीं कामें अकबराने त्यास दिली होती. खानखानानची नात शहाजहान यास दिलेली असून, खानखानानच्या हुकुमानें खूश्रूचा वध होऊन शहाजहानच्या