Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११५ )

त्यांचे सर्व हल्ले तिर्ने परत फिरविले, आणि उजाडण्याच्या आंत तिर्ने खिंडीच्या जागीं अजमातें आठ फूट उंचीचा तट मोठ्या धडाक्याने बांधून काढावला; तथापि मोगलसैन्यापुढे आपला निभाव लागणार नाहीं, हे जाणून तिनें विजापूरच्या फौजेस त्वरेनें आपल्या मदतीस येण्याविषयीं पत्रे रवाना केलीं तीं पत्रें मुरादच्या सैन्यांतील लोकांनी पकडून त्याच्याकडे नेलीं, तेव्हां त्यानें " होईल तितके लवकर या; तुझा सर्वोचगेचर एकदम लढावें, अमा माझा मनोदय आहे. " अशा मतलबाची पत्रे देऊन तीं सर्व पुढे रवाना केली. त्याप्रमाणे विजापूरकराकडील सोहलखान या नांवाचा सरदार आपल्या फौजेसह चांदचिचीच्या मदतीस येऊन दाखल झाला; आणि त्याने मोगली फौजेची दाणावैरण बंद करून त्यांची इतकी त्रेधा करून सोडिली की "वन्हाडाप्रांत आमच्या स्वाधीन करा ह्मणजे आह्मीं निघून जातो. असें मुरादनें चांदचिचीपाशीं बोलणें लाविलें व चांदचिची हिने ते मान्य केल्यावर मुराद वेढा उठ वून दौलताबादच्या रस्त्याने परत निघून गेला. ( इ० सन १५९४.) त्यानंतर चांदबिबी हिनें चावंदच्या किल्ल्यांतून बहादूरशहा यास आणवून त्याची मोठ्या समारंभाने निजामशाहीच्या गादीवर स्थापना केली व महंमदखान या नांवाच्या सर- दारास मुख्य प्रधान नेमून ती राज्यकारभार पाहूं लागली, " अहंमद हा निजामशाही घराण्याचा खरा वारस नाहीं, " अशी इब्राहीम अदिलशहानें मिआन मंजूची खात्री करून दिली; तेव्हां त्याने अहंमदचा पक्ष सोडिला; तेव्हां अदिलशहाने अहंमदास तहाहयात नेमणूक करून दिली; व मिआन मंजू यास आपल्या पदरी सरदार ह्मणून ठेवून घेतलें.

 बहादूर निजामशहा यानें इ० सन १५९४ पासून ६० सन १६०० पर्यंत राज्य केलें; चांदबिबी हिनें महंमदखानास राज्याचा मुख्य प्रधान नेमिलें; परंतु त्यानें राज्याचा सर्वच कारभार बळकविला व दिवसेंदिवस तो अतिशयच प्रबळ होत चालला असें पाहून चांदबिबी हिनें ही हकीकत इब्राहीम अदिलशहास कळविली व महंमदखानाचे प्रस्थ मोडून टाकण्याकरिता त्याची मदत मागितली; त्याप्रमाणें अदिलशहा यानें सोहलखान या नांवाच्या सरदारास तिच्या मदतीस पाठविलें व त्यानें नगर येथे येऊन तेथील किल्ल्यांस वेढाही घातला; तेव्हां महंमदखानानें त्याचा प्रतिकार केला; व खानखानान या सरदाराच्या आधिपत्याखाली वन्हाडांत मोंगली फौज होती, तिला आपल्या मदतीस बोलाविले; परंतु महंमदखानाचें हें अविचाराचें कृत्य इतर सरदार मंडळीस आवडलें नाही, त्यामुळे त्यांनीं महंमदखानास पकडून चांद- बिबीच्या हवाली केलें; तेव्हां तिचा अधिकार पूर्वीप्रमाणे चालू लागला. त्यानंतर तिनें मेहंगखान हबशी या नांवाच्या प्रतिबंधांत असलेल्या सरदारास तेथून मुक्त केले व त्याची मुख्य प्रधानाच्या जागी नेमणूक करून ती पुन्हा पूर्वीप्रमाणे राज्यकारभार करू लागली.