व त्यास कैद करून दौलताबाद येथील किल्ल्यावर प्रतिबंधांत ठेविलें ( इ० सन १६८७ सप्चर) व याच ठिकाणी तो अखेरीस मृत्यू पावला. हा शहा मोठा लोकप्रिय होता, त्यामुळे त्यास विनाकारण पदभ्रष्ट केल्याबद्दल त्याच्या प्रजेस अती- शय वाईट वाटले. या शहाच्या सौजन्याविषयीं व शौर्याविषयों अनेक गोष्टी लोकांच्या तोंडून त्या प्रांतांत अद्याप ऐकूं येतात. अशा — सज्जन राज्यकर्त्यांचा इतका दुःखदायक शेवट व्हावा ही त्याच्या नशिचाच्या चमत्कारिक योगायोगाची गोष्ट होय, असेच ह्मणर्णे प्राप्त होतें.
अशारीतीनें गोवळकोंडे येथील कुशाही घराण्याचा शेवट झाला. हैं राज्य बहामनी राज्याशीं व त्यानंतरच्या इतर राज्यांपैकींच्या चारी राज्यांशी तुलना करून पाहतां पुष्कळच सुसंपन्न व सुव्यवस्थित होतें, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. मोंगल बादशाहीच्या इतिहासाकडे लक्ष देतां असें दिसतें कीं, बाचर हा त्यास राज्यपद प्राप्त झाल्यावर पुढे लवकरच मृत्यू पावला, हुमायून यासही एकसारखा राज्याचा उपभोग न घेतां येतां मधील पंधरा वर्षांचा काळ त्यास पदभ्रष्टतेत कंठावा लागला; आणि इ० सन १५५६ मध्ये अकचर गादीवर बसला तेव्हांपासून तो इ० सन १७०७ मध्ये अवरंग- झेच मृत्यू पावला तोपर्यंतच्या सतत १५१ वर्षाच्या अवधीत एकामागून एक अशा अकचर, जहांगीर, शहाजहान व अवरंगज्ञेच या चारच बादशहांनी राज्य केलें आहे. झणजे चारच राज्यकत्यांनी लागोपाठ दीड शतकपर्यंत सारखें राज्य केल्याची इतिहासांत थोडींच - फार थोडींच उदाहरणे आहेत; कुत्बशाही राज्य हेही एक त्यांपैकीचेंच उदाहरण आहे; आणि मोंगली राजघराण्याप्रमाणेच या घराण्यांतील फक्त सहाच सुलतानांनी - ह्मणजे कुली, जमशीद, इब्राहीम, महंमदकुली, अब्दुला हुसेन व अबू- हसन कुत्बशहा यांनी इ० सन १५१२ पासून इ० सन १६८७ पर्यंतच्या १७५ वर्षे एकसारखे लागोपाठ राज्य केलेले आहे; शिवाय अबू हसन पभ्रष्ट होऊन कुत्बशाही राज्य नष्ट झाल्यामुळेच हा काळ पावणेदोन शतकांचा गणण्यांत आला आहे; आणि जर कुत्बशाही राज्य नष्ट न होता अबू हसन गादीवर असता तर त्याच्या मृत्यूपर्य तच्या कालाची गणना केल्यास तो काळ वरील पावणेदोन शतकांच्या काळाहून अधिकच भरला असता हे उघड आहे; शिवाय अकबरापासूनच्या चारी मोंगल बादशहांप्रमाणेच हे सहा राज्यकर्तेही कर्तबगार व हुषार निरजलेले आहेत; व अशी उदाहरणें इतिहासांत फार थोडीच आढळून येत असल्यामुळे ती लक्षांत ठेवण्यासारखी आहेत.
बहामनी राज्यापासून निर्माण झालेलें चवथें राज्य ह्मणजे अहमदनगर येथील निजामशाही हे होय. विजयानगर येथें तिमाप्पा बहिरव या नांवाचा एक ब्राह्मण
१४