नाहीं- है तो पूर्णपणे जाणून होता; मनुष्याच्या मृत्यूनंतर एक कीर्ति किंवा अप-
कीर्ति मागे राहते, परोपकारीत आपले आयुष्य खर्च करीत राहून, लोकसंग्रह व
लोककल्याण साधांत राहून त्यांत आनंद मानणारा मानवी प्राणी, आणि हट्टी हाडा-
मांसाचा, नेहमींच दुसन्याचे नुकसान करीत राहण्याच्या प्रवृत्तीचा प्रत्येक विध्वंसकारक
गोष्टींत सदोदित रममाण होऊन त्यांतच आनंद मानणारा मानवी प्राणी हे उभयतांही
आपआपल्या मृत्यूनंतर कीर्ति व अपकीर्ति या रूपाने जिवंत राहतात, ही गोष्ट त्याला
पूर्णपणे माहीत होती; पण एखादा अट्टल दारूचाज आपली तल्लफ " घालविण्या-
करितां जशी पशांत सारखी दारू ओतीत असतो, पण त्यामुळे त्याची तलफ न जातां
ती सारखी वाढत जाते व तोही तलफेच्या नरडीस नख देण्याकरितां हट्टानें सारखे
आपल्या नरड्यांत "गिलास " ढोसितो, व अखेरीस आपल्या जन्माचें मातेरे करून
घेतो; अथवा एखादा अट्टल जुगारी सारखा अंगावर डाव येऊं लागल्यावर ज्या-
प्रमाणे चिडीस जाऊन आपण होऊन आपल्या सर्वस्वाचा नाश करून घेण्यास
तयार होतो; त्याप्रमाणेच औरंगझेबाने आपल्या रुतीनें निर्माण केलेल्या राजकीय
तुफानी समुद्रांत जसजसे त्याच्या नशीबाचें तारूं भवितव्यतेच्या खडकावर फुटून अंति
आत जाण्याच्या मार्गास लागले, तसतसा तोही पूर्णपणे हट्टास पेटून गेला; आणि
याच हट्टानें तारूं निकालास लागून त्याच्या मृत्यूबरोबरच खऱ्या व वैभवसंपन्न
मांगलबादशाहीचा अंत झाला !!
औरंगझेब जवळ आला असें कळतांच अबूहसन शहा याने त्यास जड-जवाहीर
व नाना प्रकारच्या मौल्यवान् देणग्या पाठविल्या; तथापि औरंगझेबानें
आपल्या जन्मस्वभावास अनुसरून, शहाच्या प्रधानास व सैन्यास फितवून आपला
कार्यभाग सिद्धीस नेण्याचा उद्योग आरंभिला; आणि त्यांन यशस्वी झाल्यावर,
त्यानें शहा बदली व विषयी आहे; स्पानें ब्राह्मणास प्रधानाची जागा दिली; संमा-
जीशी स्नेह केला व पाखंडी लोकांस तो आश्रय देतो" असे शहावर दोषारोप केले;
त्याच्याशी युद्ध करण्याची तयारी केली; व शहाच्या शरणागत शहाच्या विनवण्याकडे
कोणत्याही प्रकारें लक्ष न देतां त्यानें गोवळकोंड्याच्या किल्लघास वेढा दिला. या
वेळीं-जरी शहाचा वजीर व त्याचे पुष्कळ सैन्य फितूर होऊन अवरंगझेबास
जाऊन मिळाले होते तरी-शहाने मोठ्या शौर्यानं सतत तीन महिने अवरंगझे-
बाच्या सैन्याबरोबर टिकाव धरून किल्ल्याचे संरक्षण केले; आणि अखेरीसही पुन्हाँ
फितूर करूनच अवरंगझेबास तो किल्ला हस्तगत करून घ्यावा लागला. किल्ला
हस्तगत झाल्यावर अवरंगझेबाने शहास पदभ्रष्ट करून त्याचे सर्व राज्य खालसा केलें: