Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७८ )

खात हे प्राणी मोठे होत जाऊन ज्या दिवशीं तिच्या शरिराचा शेवटचा अवशेष ते खाऊन टाकितात त्याच दिवशी त्यांची वाढ पूर्ण होऊन ते स्वतःचें जीवन चालविण्या- इतके मोठे व स्वतंत्र होतात. त्याप्रमार्गेच यहामनी राज्यापासून निर्माण झालेल्या पांच राज्यांनी त्या राज्यास खाऊन टाकून व त्याच राज्यावर ती पोसली जाऊन मोठीं व स्वतंत्र झाली. हें बहामनी राज्य पूर्ण भरभराटींत असल्यावेळीं मोठें ऐश्वर्यवान् व दिल्लीच्या मोगल बादशाहतीच्या तोडीचें होतें; दक्षिणेस तुंगभद्रा नदीपासून उत्तरेस थेट नर्मदा नदी- पर्यंत त्याचा व्यापक विस्तार झालेला होता व ते मोंगली राज्याप्रमाणेच नियमबद्ध, व्यव- स्थित व सत्तापूर्ण होतें, परंतु न झेंपणाऱ्या अवजड सत्तेचे एकीकरण, अवजड राज्य- विस्तार, अव्यवस्थित राज्यकारभार, प्रांतिक अधिकान्यांना दिलेली अमर्याद सत्ता व त्यामुळे त्यांचा वाढत गेलेला शिरजोरपणा, नालायक राज्यकर्ते गादीवर आल्यामुळे मध्य- वर्ती सत्तेस लागलेली ओहोटी व आपसांतील धार्मिक मतभेदामुळे तिला मिळालेली गती — वगैरे अनेक कारणांमुळे तें राज्य असेरे नामशेष होऊन गेलें; आणि योगायोग असा की, याच वर्षी — दक्षिणेतील बलाढ्य बहामनी राज्य नष्ट झाले त्याच वर्षी- उत्तरेस दिल्ली येथें बादशहा बाबर याने एका बालष्ट मोगल साम्राज्याची स्थापना केली;हाणजे बहामनी राज्याच्या मृत्यूबरोबर मोंगल राज्याचा जन्म झाला; आणि याच मोंगल राज्यानें पुढें बहामनी राष्ट्रपुरुषाच्या कांहीं मुलांना खाऊन टाकिलें; व तीं राज्ये नामशेष करून टाकिली.

 या बहामनी राज्यांत बहुतेक प्रजा हिंदू होती. बहामनी राज्यकर्ते आपल्या हिंदू- प्रजेस विनाकारण त्रास देत नव्हते, अथवा धार्मिक छळही करीत नव्हते; इतकेच नव्हे तर हिंदू लोकांच्या मदतीचीच त्यांना नेहमीं आवश्यकता भासत होती; यादवांच्या राज्याच्या काळापूर्वीपासूनच कोंकणांत, घाटमाथ्यावर व महाराष्ट्रति सरदार, जहागिरदार, जमिनदार व इनामदारवर्ग अस्तित्वांत होता आणि “ ६० सन १४५० च्या सुमारास खानदेशाच्या पारींत निकम ठाण्यास चिंचदेव राणे यांचे वंशज, कोळवणांत कोळी, रामननगरास राणे, सोनगड व रायरी प्रांतांत येथील राजे, शिरकाणांत शिरके, खेळ - व्यास शंकरदेव, वाडीस सांवत, बेळगांवास कर्णराज, मोरगिरीस मोन्ये ( ऊर्फ मोरे ) असे लहान लहान मराठे संस्थानिक राज्य करीत होते व या सर्व राज्यांना पुढे बहामनी सत्तेच्या अंकीत व्हावे लागलें होतें. ( राजवाडेरुत मगठ्यांच्या इतिहासाची साधने; खंड ८ प्रस्तावना पहा. ) तथापि राज्यांत वसाहती व लागवड करून तेथील वसूल गोळा करण्याकरिता देशमूख, सरदेशमुख, देशपांडे, सरदेशपांडे, कानगो व सरकानगो, पाटील व कुळकर्णी वगैरे अधिकारी मुसलमानी राज्यांत नेमण्यात येत असत; त्यापैकी बहुतेक सर्व हिंदू अथवा मराठे वतनदार असत आणि राज्याच्या वसुलीच्या प्रधान वाचतीत त्यांना हिंदू वतनदार-