Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७७ )

महंमदगवान हा इराणांतून इकडे आला, त्यावेळी त्यानें आपणाबरोबर चाळीस हजा- रांची रक्कम आणिली होती; त्या रकमेवर तो मरेपर्यंत व्यापार करीत असे; व मुद्दल कायम ठेवून जो नफा मिळेल त्यांतून दोन रुपये स्वतःच्या खाण्याकडे व दोन रुपये कपब्थालस्याकडे तो खर्च करीत असे. याप्रमाणे या धोर पुरुषाचा अतीशय साधा वर्तनक्रम असल्याचे कोशरक्षक निजामुद्दीन याजकडून कळल्यावर शहासच फक्त नव्हे तर गवानच्या शत्रूसही अतीशय आश्चर्य वाटलें. त्यानंतर गवान विरुद्धचें हें सर्व कार- स्थान बाहेर आले आणि या थोर पुरुषाचा वध केल्याबद्दल महंमदशहास इतका पश्या- ताप झाला की, त्यामुळे तो झुरणीस लागून पुढे लवकरच मृत्यू पावला.

महंमद गवान हा मोठा मुत्सद्दी, हुषार, शूर व साधुस्वभावाचा असून तो स्वतः कविता करीत असे व त्यास गणितशास्त्रार्चेही उत्तम ज्ञान असे. 46 महंमद गवानची योग्यता त्यावेळी सर्व लोकांत मोठी होती, इतकेंच नाहीं, पण हिदुस्थानातील त्यावेळेपर्य- तच्या सर्व मुसलमानांमध्ये इतका थोर व शहाणा पुरुष निपजला नाहीं असें समजतात, स्वदेशाची नोकरी करितांना स्वार्थ साधण्याची किंवा स्वतः मोठेपणास चढण्याची त्यास यत्किंचित् इच्छा नव्हती. राजावर त्याची भक्ति अगदी पूर्ण व अकृत्रिम होती. दोन अल्पवयी व अप्रबुद्ध राजांचे त्याने संगोपन केले; पण त्यांस बाजूस सारून स्वतःचा तळीराम गार करण्याचा अधमपणा त्यानें केला नाहीं. त्यानेंच धोरपदास चढविलेले सरदार पुढे लवकरच अधिकार बळकावून स्वतंत्र होऊन बसले; तर तीच गोष्ट त्यास करण्यास फारशी दुर्घट नव्हती. औदार्य व निःपक्षपात कायम ठेवून त्यानें केलेल्या सुधारणा, युद्धकलेत दिसून आलेलें त्याचें चातुर्य व धीटपणा, त्याची अप्रतिम न्यायबुद्धि आणि खाजगी व सरकारी संबंधांत परोपकार करण्याची इच्छा इत्यादि अनेक गुणांनीं इति- हासति त्याचें नांव अजरामर झालें आहे. " ( मुसलमानी रियासत पान २३३ - २३७ पहा.) बहामनी राज्याच्या इतिहासांत त्याच्या थोरपणाच्या अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत, आणि दक्षिण देशांत अथवा हिंदुस्थान देशांतच नव्हे तर जगातील कोणत्याही देशाच्या इतिहासांतील थोर पुरुषांच्या मालिकेत या पुरुषाची गणना होईल इतकी अलौकिक त्याची योग्यता होती; ही गोष्टही वरील विवेचनावरून सहज सिद्ध होत आहे.

 महंमदशहा बहामनी याच्या काळांत बहामनी राज्यांतून पांच स्वतंत्र राज्यें निर्माण झाली; व ३० सन १५२६ मध्ये ते नष्ट झाले. “ सुरवंट " किंवा " गुला कांटेरी केसाचा एक सरपटणारा प्राणी आहे. या प्राण्याच्या ( " घुला " ) या नांवाचा जन्माबरोबरच त्याच्या आईचा मृत्यू ठरलेला असतो; आणि आपल्या आईला सात