Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७४)

६ वारंगळ हा प्रदेश आजीमखान याजकडे सोपविला होता.

४ वम्हाड-७ गावेल - हा प्रदेश फत्तेउल्ला इमाद उल-मुल्कू याच्या

ताब्यात दिला होता.

८ माहूर - हा प्रदेश हबशी सुदावदखान याच्याकडेस सोपविला होता.


शिवाय या सर्व सुभ्यांमधील राज्यकारभाराचे बारकाईने निरीक्षण करता यावे म्हणून या आठही सुभ्यांमधील कित्येक ठिकाणचा वसूल शहाच्या साजगी सर्चाकडे लावून दिला होता व त्याठिकाणांची व्यवस्था ठेवून तो गोळा करण्याकरिता स्वतंत्र अभि- कारी नेमण्यात आले होते; त्याप्रमाणेच पूर्वी सुभेदाराच्या ताब्यांत त्याच्या प्रांतांतील सर्व किल्ले असत; त्यामुळे त्यांना बेर्डे करण्यास सवड मिळत असे; परंतु गवान यानें नवीन व्यवस्था करून प्रत्येक सुभेदाराच्या ताब्यांत फक्क एकच किल्ला ठेविला प बाटल्यास त्यानें त्या किल्लांत रहावें असें ठरवून बाकी किल्ल्यांवर स्वतंत्र अधिकान्यांची व सैन्याची नेमणूक केली; ही व्यवस्था महंमद गवानच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली; परंतु त्यानंतर सर्वच राज्यव्यवस्थेत उलटापालट झाली; अनेक घोटाळे माजले; प्रांतिक सरदार शिरजोर झाले; बहामनी राज्याच्या -हासाचीं व नामशेष होण्याची पूर्वचिन्हें उघड उघड दृग्गोचर होऊं लागली; शहाचा अधिकार संपुष्टांत येऊन नष्ट होण्याच्या मार्गास लागला, आणि अखेरीस या बहामनी राज्याचा -हास होऊन त्यांतून निरनिराळी पांच स्वतंत्र मुसलमानी राज्य निर्माण झाली.

 महंमद गवान या राज्यव्यवस्थेसंसंधी ज्याप्रमाणे उपरीनिर्दिष्ट व्यवस्था केली, त्याप्रमाणेच त्याने सैन्याच्या बाबतीतही सुव्यवस्था केली; व सैन्यास नियमीतपणें पगार देण्यासंबंधी नियम ठरवून त्याची सक्तीने अंमलबजावणी केली. ले. कर्नल-बिम्स्- यानें लिहिलेल्या फेरिस्त्याच्या इंग्रजी पुस्तकांत ( भाग दुसरा पान ५०४ पहा. ) या सैन्यविषयक बाबतीसंबंधी एक मोठा महत्वाचा तुलनात्मक सका दिलेला आहे, व त्यावरून महंमद गवानच्या सैन्याच्या बाबतीतील व्यवस्थेचें योग्य महत्व सहज लक्षति येण्यासारखे आहे. तो तक्ता खाली लिहिल्याप्रमाणे:-

 "दक्षिणेतील बहामनी राज्याच्या कारकीर्दीत स्वतःचा घोडा व हत्यारे बाळगणान्या पांचशे घोडेस्वारांच्या पथकाचा इ० सन १४७० मधील खर्च, आणि तेवढ्याच इंग्रजी लष्कराचा ६० सन १०२८ मधील खर्च, याचा तुलनात्मक त"