Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४८ ) घेतला. हा देश सतत अडीचरों वर्षे मोंगल लोकांनी आपल्या ताब्यात ठेवला, आणि इ० सन १२३८ पातून इ० सन १२४१ पर्यंत अर्धा ह्मणजे दक्षिण युरोपखंड त्यांनीं नामशेष करून टाकिला, परंतु इ० सन १२४१ मध्यें ओत्काईखान मृत्यु पावला आणि बातू हा युरोपखंडांतून परत आला. त्यामुळे या तातीर भोगलांच्या हातून युरोपखं- डाची यावेळी सुटका झाली. तथापि युरोपांतील शिया देशावर त्यांचा इ० सन १४७० पर्यंत अंमल चालू होता. त्यानंतर आयव्हन या नांवाच्या एका शूर व पराक्रमी पुरुषानें त्यांना रशियामधून हो कलून दिलें, आणि स्वतः तेथील राज्यपद धारण केलें. हाच अर्वाचीन राशियाचा पहिला बादशहा असून ( ६० सन १४६२ ते १५०५ ) या वेळे- पासून त्यास आयन धी मेट " अशी संज्ञा प्राप्त झाली. (6 ओत्काईखानानंतर तुलूईखानाचा मुलगा कुब्लाईसान यानें चीन देश आपल्या हस्तगत करून घेऊन पेकीन है शहर आपल्या राजधानीचे ठिकाण केले. त्याच्या वंशास चीनच्या इतिहासात "युएन वंश" असे म्हणतात. या वंशाने त्या देशांत दीडशें वर्षे आपला अंमल गाजविला. पुढे रशियाप्रमाणेच याही देशातील त्यांची सत्ता इ० सन १३६८ मध्ये नष्ट होऊन चिनी लोकांनी त्या ठिकाणी पुन्हा आपले राज्य स्थापन केले. कुब्ला ईण्या मृत्यूनंतर तातर मोगलांच्या वर्चस्वास उतरती कळा लागली. त्यानंतर पुढे केव्हाही आजतागायत आशियातील लोकांनी युरोपखंडावर स्वारी करून तिकडे आपला अंमल बसविला नाहीं; उलट युरोपियन राष्ट्रांनींच वर्चस्वाचें क्षेत्र (Sphere of Influ ence संरक्षित दोस्तसरकार, Protectorate Ally संरक्षित राज्य Protector- nte मांडलीक राज्य Dependency मांडलीक राज्यकर्ता Dependent Prince स्वतंत्र राज्यकर्ता अथवा दोस्तसरकार ( Independent Prince or Ally ) तैनाती दोस्ती, ( Subsidiary Alliance ) आघात प्रतिबंधक राज्य, ( Buffer State ) वगैरे निरनिराळ्या संज्ञेनें, व संपंधानें आशिया खंडातील बहुतेक सर्व राज्यांवर आपले वर्चस स्थापन करून ते आजतागायत कायम ठेविलें आहे. युरोपखंडाच्या पूर्वकालीन परिस्थितीसंबंधानें पाहता, मुसलमानी रियासतीत म्हटल्याप्रमाणें “ऐतिहासिक कालांत युरोपवर तीन मोठाले घाले आले. पाहिला घाला युरोपच्या उत्तरेकडून गाथ वगैरे रानटी लोकांनी घालून रोमन बादशाहीचा विस केला ( इ० सन ४१० ) परंतु त्यामुळे युरोपियन सुधारणेचें नुकसान न होता तिचा फायदाच झाला; व रोमन बादशाहीच्या जीर्ण सुधारणेला ह्या रानटी लोकांच्या ताज्या दमाची व प्रखरतेची नवीन पुष्टी मिळाली. दुसरा हल्ला अरब मुसलमानांनी आठव्या शतकाच्या आरंभ केला; त्यात त्यांनी पश्चिमेकडून स्पेन वगैरे देश जिंकले. ह्या हल्लयामुळे युरोपीय