Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८ ) " , झाल्यावर आपल्या इष्टमित्र मंडळीसह एकत्र जमून त्याचा " दिवस " अथवा " तेरावा " कारतात, त्याप्रमाणेच मुसलमान लोकही हुसेनचा दिवस करितात. कत्तलच्या रात्रों, व दहाच्या तारखेस दिवसा ताबूत व स्वाऱ्या थंडद्या होण्याकरितां उठतात त्या दिवशी ठिक- ठिकाणी साखरपाणी व सरबत ठेवण्याची व ते लोकांना फुकट पाजण्याची व्यवस्था करण्यांत येतें; शिवाय या दहा दिवसांत आणि मुख्यत्त्वें करून नवव्या व दहाव्या तारखेस फकीर, गरीब, निराश्रित वगैरे लोकांना अन्न, पैसा, कपडा, इत्यादा रूपाने दानधर्म करण्यांत येतो. ईश्वराची अथवा विभूतीची प्रतिमा करून तिची पूजा करणें हें मुसलमानी धर्मात पाप गणिलेले आहे, त्यामुळे कित्येक मुसलमान ताबूत करीत नाहीत; अथवा या उत्सवांत भागही घेत नाहीत; तथापि ही संख्या अल्प असून मांगेली बादशाहत स्थापन झाल्यानंतर पुढील वैभव संपन्नापासून ताबूतांचा प्रचार इतका वाढला की, टिकटिकाणी भजन- पूजन चालून त्यास हिंदू लोकांच्या देवस्थानाप्रमाणे महत्व प्राप्त झालें; आणि आज तागायत ही ते तसेंच कायम आहे. ताबुताच्या सणाप्रमाणेच " इंद" या सणाचेही मुस्लमानांत विशेष महत्व मानिलेले आहे; हा सण रमजान महिन्यांन्या अखेरीस असतो. रमजान महिन्याच्या शेवटच्या तारखेस चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, शास्त्राप्रमाणें इंदीचा दिवस धरितात; त्या दिवशी चंद्रदर्शन झाले नाहीं तर दुसन्या दिवशीं इंद न धरितां, दुसन्या दिवशी पुन्हां चंद्रदर्शन करून किंवा त्या दिवशी चंद्रदर्शन न झालें तरी त्याच्या दुसऱ्या दिवशीं इंद धरावी, असा शरा आहे. चंद्र दर्शन करून दुसऱ्या दिवशी ईदीच्या संबंधानें मशीदीत नमाज व खुत्या करितात; आ.ण चंद्र दर्शन झाल्याशिवाय रमजानच्या उपासाची पारणा होत नाही, इतकेच नाही तर शराप्रमाणे सुमारे साडे अकराच्या पलीकडे नमाज व खुत्या करणे, ह्या गोष्टी धर्म थाहा ( मकरूच ) मानिलेल्या आहेत. वर वर्णन केल्याप्रमाणें उमईद अथवा ओमियादी वंशांतील सीरिया प्रांताचा सुभेदार मुआविया यानें मदिना येथील अरबीलाफत महंमदाच्या मृत्यू नंतर तीसच वर्षात दमास्कस येथे नेऊन ( इ० सन ६६१ या वर्षी ) तें शहर आपल्या राजधानांचें ठिकाण केलें. त्यानंतर त्या ठिकाणी ती इ० रुन ७५० पर्यंत ह्मणजे ८९ वर्षे टिकली या अवधीत अरबांनी आशिया मायनर जिंकिल्या नंतर पूर्व रोमन बादशाहतीची राजधानी असलेल्या कान्स्टांटिनोपल या अति प्रसिद्ध व विशेष महत्वाच्या शहराला शह देऊन युरोप खंडाचें पूर्व नाके असलेली महत्वाची अशी बारफरसची सामुद्रधुनी हस्तगत करून घेण्याचा पांच वर्षे - ३० सन ६७३ ते ६७७ पर्यंत सतत प्रयत्न केला; परंतु त्यांत त्यांना यश आलें नाहीं. तथापि अरच लोकांचा या नाक्याच्या ठाण्यावर विशेष