Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

c "6 विषयांकडे वळलें होतें. अरथलोक मूर्तिपूजा करितात, ही गोर त्यास पसंत नसल्यामुळे त्याला स्याबद्दल अतीशय वाईट वाटले, आणि आपण एक नवाच धर्म स्थापन करून लोकांस सत्य भक्तिमार्ग दाखविला पाहिजे, असा त्यानें निश्चय केला; आपणांस परमेश्वरी स्फूर्ती झाली आहे असें ह्मणून त्याने आपल्या वयाच्या ४० व्या वर्षी एकवर्ग मताचा एक निराळाच धर्म स्थापन केला, व आपली बायको खदीजा, चुलतभाऊ ह्मणजे अबू तालीय याचा मुलगा अल्लो व जाँवई या तिघांना त्याने आपल्या या नूतन धर्माची पहिल्याने दिला दिली, व इतरांनाही तो तसाच धर्मोपदेश करूं लागला. त्यांन लोकांस असें सांगितले की, मी आता जो ईश्वरप्रणित " कुराण " या नावाचा पंथ प्रसिद्ध करीत आहे, तो परमेश्वरानें मला गाबियल या नावाच्या एका देवदूताच्या द्वारे दिलेला आहे. व हें खरें धर्मशास्त्र असून त्याप्रमाणे लोकांनो आचरण करावें, व त्यांनां तें करण्यास लावावें, असा परमेश्वराने मला हुकूम दिलेला आहे; अशा रीतीनें आपल्या वयाच्या ४० घ्या वर्षी महंमद हा आपणास पेगंवर-ह्मणजे देवाचा प्रेषित असें ह्मणवून घेऊं लागला, व त्यास त्यानंतर आपली व्यायको, चुलत भाऊ व जांव पौशिवाय आणखा पांच शिष्य या नवीन धर्मात येऊन मिळाले. तथापि सर्व साधारणतः आरथ लोकांस व काया " मंदिराचे रक्षक असलेल्या त्याच्याच सुरेश जातांस महंमदाचा हा नवीन धर्म मान्य नव्हता; त्यामुळे त्यांनी त्याचा छळ करण्यास प्रारंभ केला; इतक्यांतच त्याच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याची बायको खदीजा ही ही मृत्यू पावली. त्यामुळे तो उदास झाला, व मक्का शहराचा त्याग करून तेथून अजमासे अडीचशे मैलांवर असलेल्या मदिना या नांवाच्या शहरों जाऊन तेथें वास्तव्य करावे, असा त्याने विचार केला व त्याप्रमाणें तो मक्का येथून तिकडे पळून गेला. त्यावेळी अयूयकर या नावाचा एकटाच शिष्य काय तो त्याच्या बरोबर होता. हा अचू- व्यकरही मोठा हुषार असून त्यानेंच पुढे कुराणातील निरनिराळ्या वेळी प्रसिद्ध झालेल्या अध्यायांचें एकीकरण केलें; महंमद हा मका सोडून पळाला, असें त्याच्या विरुद्ध असलेल्या मंडळीस कळल्यावर कित्येक लोकांनी त्यास ठार मारण्याकरितां त्याच्या पाठलागावर मारेकरी पाठविले; परंतु त्या सर्वांची नजर चुकवून तो मोठ्या कष्टानें अबू बकरसह मदिना येथे इ. सन ६२२ मध्यें ता. १५ जुलई रोजी आपल्या वयाच्या ५३ म्या वर्षी सुरक्षितपणें येऊन पोहोंचला. या पलायनास अरबी भाषेत “हिजरा " असे झणतात; व त्यावरूनच अरथी अथवा महंमदानें चालू केलेल्या सनाला. " हिजरी सन" असें ह्मणत असून याच कालापासून त्याची गणना करण्यास सुरवात झाली आहे. "