Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोरेश या जातीत इष्मी कुळीत इ. सन ५७० या वर्षों ( काही ठिकाणी इ. सम ५६९ यावर्षी असा उलेख आढळतो. ) जम्मास आला; याच्या आजाचें नांव अब्दुल मुतालेव असं होतें, ष तो मोठा प्रसिद्ध व दानशूर व्यापारी ह्मणून त्याची अतिशय कीर्ती असून एकदा दुष्काळाच्या वेळों आपल्या पदरचें पुष्कळ धान्य व संपत्ति खर्च करून हजारों दुष्काळ पीडितांचे प्राण त्याने वाचविले होते, अब्दुल मुतालब हो ११० वर्षांचा होऊन मृत्यु पावला; त्यास सदा मुली आणि तेरा मुलगे अशी एकंदर एकूणीस मुले होती; त्यामध्ये अबदुल्ला या नावाचा एक सुंदर मुलगा असून त्याच्यावर मुतालेब याची अतोशय प्रांती होती; या मुलाचें अमीना या नावाच्या एका मुलीशी लम झालें, व या खोपुरुषांच्या पोटी महंमद पैगंबर हा जन्मास आला. महंमद हा लहान असतानाच त्यांचे आईबाप मृत्यू पावले, त्यामुळे त्याचा चुलता अयू तालाब (ऊर्फ अचूतलेय) यानें त्याचें पालनपोषण केलें. अरबस्थान हा देश अतीशय रुक्ष, रेताड आणि नापीक असल्यामुळे तेथील लोक मेंढ्यांचे व गुरचि कळप घेऊन ते चारण्याकरितां चोहोंकडे भटकत फिरत असत, अथवा उंटांची कारवानें घेऊन परदेशी बरोबर व्यापार करीत असत; त्याप्रमाणेच महंमद हा लहानपणी मेंढ्यांचे कळप चारीत होता; आणि तो मोठा झाल्यावर त्याने इतरांप्रमाणे उंटांची कारवाने घेऊन व्यापार करण्यास सुरवात केली होती; त्यानंतर व्यापारा निमित्त मका, दमास्कस आणि सीरिया प्रांतांत त्याने अनेक खेपा केल्या. त्यास फारशी भाषेचें ज्ञान नव्हतें; तथापि त्याची कल्पना व आकलनशक्ति, आणि दूरदृष्टी अतीशय प्रखर असून तो अलोकिक बुद्धिवान होता. शिवाय लहानपणापासूनच त्याची बुद्धी धर्ममार्गाकडे वळलेली असून तो मूर्तिपूजेच्या विरुद्ध होता. महंमद हा आपला नवीम धर्म स्थापन करीपर्यंत आरब लोक मूर्तिपूजक होते; व ते सूर्य, चंद्र, तारे वगेरेचें भजन पूजन करीत असून, आणि त्यांचं मक्का येथें “काबा" या नांवाचें एक प्रसिद्ध व पुरातन मंदिर असून त्यांत निरनिराळ्या व अनेक देवतांच्या मिळून तनिशें मूर्ती ठेवलेल्या होत्या; व दूरदूरच्या प्रदेशातून या मंदिराचें दर्शन घेण्याकरिता अनेक यात्रेकरू स्याठिकाणों नेहमी येत होते, महंमदानें आपल्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी खदीजा या नावाच्या एका संपत्तिमान विधवा शीशी लम केले; त्यामुळे त्यास पुष्कळ संपात मिळालो. ही बाई त्याच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी होती. लम झाल्यानंतरही महंमदानें काही काळ व्यापार केला; परंतु लहानपणापासून त्याला धार्मिक यानतींविषयीं व अनेक धर्माविषयी विचार करण्याची संवय लागली होती; प्रवासांत निरनिराळ्या लोकांवित्र त्यास माहिती झाल्यामुळे त्याचें मन विशेषच उत्सुकतेनें धार्मिक-

-