Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८ ) आपल्या ताब्यात घेतल्यामुळे तिकडील बादशाही सत्ता नष्ट झाली; ज्या औरंगझेबाचा सर्व हिंदुस्थानभर दरारा होता, त्याच्याच मृत्यूनंतर पन्नास वर्षांच्या आतच " मोंगल बादशहा " हा एक निव्वळ नष्ट ऐश्वर्याचे अवशिष्ट छायाचित्र बनून गेला | दगलबाज प्रधानमंडळाच्या व अविकार बळकावू पाहणान्या महत्वाकांक्षी सरदारांच्या हातांतील एक निव्वळ बाहुले बनला आणि पुढील काळांत तर मराठे व इंग्रज यांच्या मेहेरबानीनें व आश्रयाने त्यास कालक्रमणा करावी लागली | 1 व शेवटीं इ० सन १८५७ च्या बंडाच्या काळांत, हिंदुस्थानांत एके काळी वैभवसंपन्न, प्रसिद्ध व वीर्यशाली ह्मणून दुमदुमत असलेल्या मोंगल सम्राटाचें छयाचित्र दिल्लींतून नाहींसें होऊन, त्याबरोबरच बाबरच्या राजघराण्याचा इतिहासही समाप्त झाला ।। | मोंगली व मराठी साम्राज्याचा इतिहास वाचतांना तत्कालीन राजकीय परिस्थिति लक्षांत घेऊनच मराठे व मोंगल यांच्या यशापयशाचा विचार केला पाहिजे; मोंगली राज्य व मोंगलबादशहा नष्ट झाले, तरी त्यांची आठवण नष्ट होणें शक्य नाहीं, आणि अवरंगझेबापर्यंतचा प्रत्येक बादशहा कर्तबगारच होऊन गेला, यांत काहीही संशय नाहीं, या बाबतींत सिडने ओवेन हा "India on the eve of British Conquest. " या आपल्या पुस्तकांत मोठ्या जिज्ञासेनें अर्से हलणतों की, “ या मोंगल घराण्यांत जसे एकामागून एक लढवय्ये राज्यकर्ते होऊन गेले, तसें उदाहरण दुसऱ्या कोणत्या घराण्याचे आहे १ या घराण्यांतील पहिला बादशहा साम्राज्य संस्थापक बाबर; तिसरा अकबर; यानें तर साम्राज्याचा पुनरुद्धार करून त्याचा विस्तार केला; व त्यानें चार्लस धी ग्रेटशीं तुलना करितां येईल अशीं युद्धे केली. शिवाय त्यानें असल्या, अथवा सकारण करण्यांत आल्या असल्या, आणि जरी जेते हे जितपिक्षाही अधीक सुधारलेले असले, तरीसुद्धा साम्राज्याचा विस्तार करण्यांत सूज्ञ मनुष्यास आनंद वाटावा की काय ? या प्रश्नाची त्यानें चर्चा केली आहे. आणि त्यानें असें अनुमान काढिले आहे कीं, जितराष्ट्रांबरोबर लढाई चालविणे, आणि त्यांत राज्यविस्तार करणें, है दुर्जनाला आनंदकारक होते; परंतु तेंच सज्जनाला मात्र आवश्यक वाटते." 46 १- " An congruat bonis latius velle regnare. “ आपल्या साम्राज्याचा विस्तार व्हावा, अशी इच्छा सूज्ञ मनुष्यानें करणें, है योग्य आहे की काय ? De civitate Dei, Lib IV 15. टीप १: – The Materials necessary for a sound judgement of facts are not found in the success or failure