Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३ ) - नसल्यानें, आपण नाहींशी केलेली माणसें पुन्हा आहेत अशी करावी, - जिवंत करावी, अर्से मनांत आणिलें तरी त्याचा काहीही उपयोग नाहीं, ही गोष्ट त्याला अखेरच्या वेळी पटली ।- ( २ ) अवरंगझेबानें कामयक्ष यांस पाठविलेले पत्रः- - राजपुत्र कामचक्ष यासः - माझ्या हृदयासन्निध वास करणान्या पुत्रा ! माझ्या चालत्या काळांत ईश्वरी आज्ञेनें, व त्याच्या इच्छेप्रमाणें, मी तुला माझ्यांत सामर्थ्य होतें तितक्या रीतीनें, सर्व प्रकारच्या शहाणपणाचा उपदेश आणि ज्ञानाच्या गोढी सांगितल्या, परंतु तुझ्या पोरबुद्धीप्रमाणें तूं माझ्या सांगण्याकडे जितके लक्ष द्यावयास पाहिजे होतें, तितकें दिलें नाहींस. असो; मी आतां या जगांतून एखाद्या प्रवाशाप्रमाणें जाणार | मी माझें आयुष्य निरर्थक घालविलें याबद्दल मला फार वाईट वाटतें ! परंतु आतां त्याचा काय उपयोग ? मला माझ्या पातकांचें व अविचारी कृत्यांचे फळ भोगलेंच पाहिजे; व तेंच शेवटीं माझ्या बरोबर येणार? मी व्यर्थ जन्मास आलों, याबद्दल •ईश्वर खचित आश्चर्य मानीत असेल ? मी व्यर्थ जन्मास आलों, आणि मी आलो तसा एकटाच जावयाचा ! मी केलेल्या पापी कृत्यांचा कोर्णाही वाटेकरी होणार नाहीं ! मी आपला आत्मा अनेक दुष्कृत्यांनी अत्यंत मलिन केला ! मला बारा दिवस सतत ज्वर येत होता; परंतु तो आतां गेला. जिकडे जिकडे मी पाहतों तिकडे तिकडे मला ईश्वरी साक्षात्कार दिसतात. त्यांशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. माझ्या सैन्याचें, बाजार बुणग्यांचें, आणि माझ्या पोटाचें आतां कसें होईल, ही जी मला चिंता आहे, तिचा • उपयोग काय ? हाय हाय 1 कोण हा दुर्वह लोभ आणि मायापाश ? माझी दशा काय होईल तें मला काहीच कळत नाहीं ! माझी कंबर जणूं काय मोडून गेली; आणि माझे पाय केवळ तुटल्यासारखे होऊन मला चलनवलन करण्याची देखील शक्ती राहिली नाहीं ! . व • ! जो श्वास जातो तो बरा गेला, असें प्रति निश्वासाला वाटत आहे ! मी पुष्कळ पातकें व अनेक घोर सत्यें केलीं त्याबद्दल ईश्वर मला काय शिक्षा करील तें समजत नाहीं ? आतां .

माझ्यामागें माझ्या सैन्य शिबंदीचा वगैरे बंदोबस्त माझ्या मुलांनी ठेवावा. त्यांना मी इमानी

आणि योग्य अधिकारी समजून माझा सर्व प्रकारचा वारसा व अधिकार ईश्वरास साक्षी ठेवून, त्यांच्या स्वाधीन करितों. अज्जीमशहा जवळच आहे. माझ्याशी जे प्रामाणिकपणानें वागले, त्यांचा मी प्राणनाश केला नाहीं, व त्यांच्याबद्दलचें अपयश माझ्या डोक्यावर येण्याचें कारण नाहीं. ज्याअर्थी आतां मी हा लोक सोडून जात आहे, त्याअर्थी मी तुला तुझ्या आईला व तुझ्या मुलाला ईश्वराचे संरक्षणाखाली ठेवून जातो .