Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंबर ऊर्फ अंमेर ( जयपूर ) येथील राज्यकर्ते त्यास अनुकूळ असून ग्वाल्हेर, अजमीर, शिक्री, रायसेन, काल्पी, चंदेरी, बुंदी, गायोन, अबू व रामपुरा येथील राज्यकर्ते त्याचे मांडलिक असून त्यास खंडणी देत होते. त्यानें दिल्ली व माळवा येथील मुसलमानी सैन्याबरोबर एकंदर अठरा लढाया केल्या होत्या; त्यांतील बाकरोल व घाटोली येथील युद्धांमध्ये तर स्वतः दिल्लीपती इब्राहीम लोदी हा हजर असून त्यांत त्याचा पराभव – अतीशय सैन्य नाश झाला होता, आणि त्याचा एक मुलगा राणा संग याचा कैदी होऊन त्यास संगानें चितोड येथें नेलें होतें. यावेळी मेवाडच्या राज्याची हव उत्तरेस चियानानदी, दक्षिणेस व पूर्वेस माळवा, आणि पश्चिमेस मेवाडचे डोंगर, याप्रमाणे व्यापक होती; आणि बाबर सारखा पराक्रमी पुरुष जर याच संधीस त्यास प्रति- स्पर्धी ह्मणून पुढे आला नसता तर चिनोड ही हिंदुस्थानची सार्वभौम राजधानी आणि संगराणा हा चक्रवर्ती होण्याचा समय आला होता, पण बाबरच्या हिंदुस्थानांतील आगमनानें मेवाडच्या व संगाच्या वैभववृद्धीस पूर्णपणें ओहोटी लागली १ - बाबर हाही राणा संग याच्या प्रमाणेच अनेक दुःखसंकटें हाल, उपवास व बनवास भोगलेला पुरुष असून राजा व वनवासी - जय, पराजय, सुख व आपत्ती- या अवस्था मोगीत भोगीत त्याचा स्वभाव काटक, हिंमती, हिकमती व विचारी बनलेला होता; पदभ्रष्टतेच्या दुःखानें तो हताश झाला नाहीं, अथवा इब्राहीम लोदी बरोबरील युद्धांत विजयी झाल्यामुळे त्यास उन्मादही झाला नाहीं. दिल्लांचें तख्त हाती आले तरी तो ईश्वरास विसरला नाहीं; "मी" ची बाधा त्यास झाली नाहीं; तो या विजय प्राप्तीनंतर मोठ्या नम्रपणानें ह्मणाला:- “ हा विजय ईश्वराचा आहे, माझा नाहीं. देश, तूं सदोदित असाच विजयी ऐस." त्यानंतर एकच वर्षानें व्यक्ति व राष्ट्र यांची भवितव्यता निश्चित करणारी फत्तेपुर शिकी येथील बाबर व राणा संग यांच्या मधील लढाई झाली. या युद्धाची सर्व तयारी बाबर यानें स्वतः करून तो आम्रा येथून शिक्रीच्या मार्गाने राणा संग याच्यावर चाल करण्यास निघाला; तेव्हां संगही आपणा- बरोबर राजस्थानचे सर्व राजे मदतीस घेऊन पुढे आला. चियाना नदी उतरून बाबरच्या पंधराशें लोकांची कत्तल उडविली; अशा रीतीने पहिल्यानेंच बायर पास अपशकून झाला शिवाय त्याच्या जवळील सैन्यही नवें होतें, त्यामुळे तेंही प्रसंगी कितपत टिकाव धरील अशी श्यास शंका होती; च त्यामुळे आपणांस जय मिळेलच अशी त्यास खात्री बाटत नव्हती, त्यांने रजपूत लोकांवर पाठविलेल्या अनेक टोळ्यांचा पराभव झाल्यामुळे त्याला भीति उत्पन्न झाली होती, आणि स्यांतच काबूलहून आलेल्या एका ज्योतिषानें “ या युद्धांत तुझा पराजय होणार असें P