Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण्यास त्यास शक्ति अथवा सवडच रहात नाहीं; पण वेळ निघून गेली तरी रुतीचे परिणाम निघून जात नाहीत; कायम राहतात; आणि नंतर शांत डोक्याने विचार केल्यावर त्यास आपली घोडचूक दिसूं लागते. त्या घोडचुकीचा घोड खिळा त्याचे डोकें ठोकूं लागतो. आपल्या कृतीचा त्यास पश्चात्ताप होऊं लागतो; पश्चात्तापानें कृतीची शुद्धी होत नसल्यामुळे पश्चात्तापाचें भूत त्याला जिवंतपणी छळू लागते. पश्चात्तापाचा समंध त्याच्या मानगुटीवर-नव्हे मनावर बसतो, करणीची भूर्ते डोळ्यापुढे दिसूं-नाचूं लागतात; त्यांचा खडा नंगानाच उघडया डोळ्यांनी पहावा लागतो, व डोळे मिटले तरी भावनेनें दिसूं लागतो इतकेच नव्हें, तर अशा पापी कृतीचे प्रायश्चित पिढ्यानुपिढ्याही भोगावे लागते, हा बोध यावरून घेतला पाहिजे, हे उघड आहे. व खिलजी घराण्याच्या कारकीर्दीत मुसलमान लोकांचा दक्षिणेत प्रथम प्रवेश झाला. अल्लाउद्दीन यानें दक्षिणप्रांतावर स्वारी करून देवगिरीकर रामदेवराव जाधव याचा पराभव केला; त्यामुळें इलीचपूर व त्याच्या आसपासचा प्रदेश व पुष्कळ संपत्ति अल्लाउद्दीन यास प्राप्त झाली. या सुलतानाच्या कारकीर्दीत मोंगल लोकांनी हिंदुस्थानावर अनेक स्वान्या केल्या, पण त्या निष्फळ झाल्या; उलटपक्षी याच काळांत हिंदुस्थानति मुसलमानी राज्याची भव्य प्रमाणात वाढ झाली. दक्षिणेवरील दुसन्या स्वारीमुळें तर रामदेवराय हा दिल्लीपतीचा मांडलीक बनला. ( इ० सन १३०६ ) आणि त्यानंतर बाळीस वर्षांनीच हसन गंगू ऊर्फ अल्लाउद्दीनशहा यानें दक्षिणेंत बहामनी राज्याची स्थापना केली. इ० सन १५२६ मध्यें लोदी घराण्याची समाप्ति होऊन बादशहा याबर यानें आपल्या मोंगली राज्याची स्थापना केली; तथापि याच काळांत राणा संग या नावाचा एक अत्यंत पराक्रमी पुरुष चितोड येथें राज्य करीत असून तोही हिंदूपद बादशाही स्थापन करण्याच्या विचारांत होता. पण बायरच्या स्वारीमुळे त्याचें सर्व राजकारण विस्कळीत झालें व बाबर यशस्वी होऊन त्यानें दिल्ली येथें मोंगल बादशाही स्थापन केली; मेवाडचा राजा रायमल यास संग, पृथ्वीराज आणि जयमा असे तीन पुत्र होते; त्यांपैकी संग ऊर्फ संग्रामसिंह हा इ० सन १५०९ मध्ये चितोडच्या गादीवर बसला, तो गादीवर येण्यापूर्वीच त्याचा भाऊ पृथ्वीराज याच्या बरोबरील युद्धांत त्याचा एक डोळा गेलेला होता. हा राज्यकर्ता मोठा वैभवशाली असून याच्या कारकीर्दीत मेवाडच्या राज्याची अतीशय भरभराट झाली होती. संग राण्या जवळ ८०,००० स्वार, सात मोठे राजे, नऊ राव, १०४ ठाकूर, रावळ, व रावत या नांवाचे सरदार, व ५०० हती इतकें सैन्य होतें, शिवाय मारवाड़ (जोधपूर ) ,