पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७९ )

व " मो बादशाही नौकरीत राहण्यास तयार आहे; " असा त्याजकडे अर्ज केला; बादशहाचे मनांत निजामशाही बुडवावयाची होती. आणि शहाजीचा पराक्रम व कर्तबगारीही तो पूर्णपणे ओळखून होता. त्यामुळे निजामशाही संबंधांचे आपले इष्ट हेतू सिद्धीस नेण्यास आपणास शहाजीचा अतीशय उपयोग होईल, अशी त्यानें अटकळ बांधिली; व शहाजीस आपल्या भेटीस बोलाविले. त्याप्रमाणें तो आपले दोन हजारांचे पथक बरोबर घेऊन शहा- जहान बादशहास भेटला. ( इ. सन १६२९) त्यावेळी बादशहानें त्याचा योग्य गौरव करून, त्यास पांच हजारी मनसब देऊन दोन लक्ष रुपये खर्चास दिले; व निजामशाही सरकारकडून त्यास पूर्वी मिळालेली जहागौर त्याच्याकडे कायम करून शिवाय आणखीही कांहीं प्रदेश त्याच्या दिमतीस दिला; याच वेळी शहाजहान यानें शहाजीस फत्तेखानाचीही जहागीर दिली होती, असा उल्लेख आढळत असून, शिवाजीने पुढे अहंमदनगरच्या प्रांता- वर आपला हक्क सांगितला होता, त्यावरून तो प्रांतही या वेळी बादशहानें शहाजीस बंदाल केला असावा, असे दिसतें. शहाजीप्रमाणेच, याचवेळी त्याचा चुलतभाऊ, आणि विठोजीचा दुसरा-संभाजीच्या पाठचा-मुलगा खेळोजी हा आपले दोन बंधू मालोजी व परसोजी यांसह शहाजहानच्या पक्षास मिळाला, व त्यासही बादशहानें पांच हजारांची मनसब करून दिली, व शहाजीच्या बरोबरीतील इतर कित्येक नातलगांस, व मराठा सरदारांनाही बादशाही सैन्यांत -मनसबी बहाल कबण्यांत आल्या. खेळोजी हा मोठा शूर होता; तो इ. सन १६३९ पर्यंत जिवंत होता; त्या वर्षी अवरंगझेबाने त्याची राहण्याची गुप्त जागा शोधून काढून, त्यास मोठ्या युक्तीनें पकडून ठार मारिलें.+ शहाजीस


 + खेळोजी हा इ. सन १६२९पासून इ. सन १६३३पर्यंत मोंगलांच्या आश्रयानें होता. त्यावर्षी मोंगलांनी दौलताबाद येथील किल्लयास वेढा घालून तो हस्तगत करण्याचा उद्योग आरंभला; त्यावेळी त्यानें मोंगलांचा पक्ष सोडिला; विजापूरच्या आदिलशाही राज्यांत नौकरीस राहिला; व त्यानंतर त्या राज्यातर्फे मोंगल सैन्याशी त्यानें अनेक युद्धप्रसंग केले. अशा स्थितीत स्याची बायको गोदावरी नदीवर स्नानास जात असतां तिला एका मोंगल