पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७२)

तुम्ही पहाण्यावर आपली हत्यारें ठेनून रजिवाड्यांत गेलांत तरच तुमची व हुजूरची भेट होईल; नाहींतर होणार नाहीं. " लखूजीच्या मनांत, शहा आपणांस दगा करील, असा, तिळमात्रहि संशय नसल्यामुळे त्यानें शहाच्या इच्छेप्रमाणे पहाण्यावर आपली तरवार सोडून ठेविली; व आपल्या सर्व अनुयायांकडूनहि तसेंच करविलें नंतर ही सर्व मंडळी राजवाड्यांत गेली; दरबार होऊन निजामशाहाची भेट झाली, व निजामशाहा क्षणभर बसून व बोलून कांहीं निमित्तानें उठून गेला; तोंच दरबारच्या दिवाणखान्यांत मारेकरी घुसले; व लखूजीस कैद करूं लागले; परंतु कैद होण्यापेक्षां मरण बरें, अर्से वाटून तो त्या मारेकऱ्यांबरोबर लढण्यास तयार झाला; मारेक-यांनी तरवारी चालविल्या; लखूजी व त्याचे अनुयायी यांच्या कमरेख फक्त कट्यारी राहिल्या होत्या; तरी मारेकऱ्यांवर चढाई करून ते मारता मारतां गतप्राण झाले; + या कत्तलींत लखूजीबरोबर त्यांचे मुलगे अचलोजी, व राघोजी व


 +लुकजी जाधवरावास एक उम्दा अमीर जाधवराव " असें म्हणत असत. जाधवराव हा निजामशाही राज्यांतील एक अत्यंत शूर, व बलिष्ट सरदार होता. त्यास निजामशहानें दग्यानें ठार मारल्यानंतर ष शहाजीनें निजामशाहीबरोबरील आपला संबंध साफ सोडल्यानंतर निजामशाहीतील याकूतखां या मुसलमान व उदाजीराव या मराठा सरदारांनी मिळून शहास असा अर्ज केला की, “ अशा नाजुक प्रसंगी, व मोगलासारखा प्रबळ शत्रू समोर युद्धास उभा राहिला आहे अशा वेळी इमानी व शूर अशा जाधव रावाला मारून टाकण्याची आपणांस कोणीं सल्ला दिली, तें समजत नाही. आतां जाधवरावाच्या मागे आपल्या निजामशाही राज्याचे व दौलतीचें संरक्षण करील, असा दुसरा कोण सरदार आहे १ "

 " इसी जमानेका जिक्र है के याकूनखां और उदाजीरावनें बादशहाकी खिदमत में अरजी इस मज्मूनकी लिखीके ऐसे नाजूक और जरूरत के वक्त में मुगलोंके मानिंद जबरदस्त दुष्मन सिरपर काबू ढुंदता मौजूर और मुन्तजिर बैठा है जादवराव कदीम नमक रुकारको मारनेको आपको किसने सलाह