पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७१)

तह केला; परंतु ही गोष्ट निजामशहास आवडली नाहीं; फत्तेखान हा मोंग- लाख सामील आहे, असे त्यास वाटलें; म्हणून त्यानें फत्तेखानास पदभ्रष्ट करून खीवर येथील किल्लयांत प्रतिबंघांत ठेविलें आणि तकरीबखान या नांवाच्या दुसऱ्या एका सरदाराची वजिरीपदावर स्थापना केली. तकरीबखान हा निजा- मशाही राज्याचा वजीर झाल्यावर आणि शहाजीचा सारखा सलणारा कांटा निजामशाही राज्यांतून निघून गेल्यामुळे जाधवरावाच्या मनांत, आपण पुन्हां निजामशाही राज्यांत नौकरी करावी " अ आले व त्यानें तकरीब- खानामार्फत " मी पुन्हां आपल्या आश्रयास येतों" अशी विनंती केली; परंतु शहा हा स्वभावाने खुनशी असून लखूजी हा आपला पक्ष सोडून मोंगलास जाऊन मिळाला, त्यामुळे त्याच्या मनांत लखूजीविषयीं तीव्र द्वेष उत्पन्न झाला होता; त्याबद्दलचा सूड उगविण्याची इच्छा शहाच्या मनांत पूर्णपणें वखत होती; जाधवरावास नामशेष करण्याचा त्यानें मनसुबा केला होता; आणि " आपल्या राज्यांतील पूर्वीचा सरदार व माहितगार लखूजी जाधवराव हा मोंगलास मिळालेला आहे, आणि तोच आपल्या राज्यांतील छिद्रे मोंगलांस दाखवून देत असल्यामुळे मोगल आपणांस भारी झाले आहेत. याकरितां कसेंहि करून पहिल्यानें लखूजीचा बंदोबस्त केल्या खेरीज आपणास केव्हांहि विजय प्राप्त व्हावयाचा नाहीं. " असे शहाच्या सल्लागारांनी त्याच्या मनांत पूर्णपणे भरवून दिले; त्यामुळे तर कोणत्याही युक्तिप्रयुक्तीनें लखूजीस बोलावून आणून त्यास कैद करण्याचा त्यानें बेत केला होता; तथापि वरपांगी तसे कांहीहि न दर्शवितां मायावी ममत्व व कांगावी कळवळा दाखवून त्यानें लखुजी जाधवास भुरळ पाडिली, व त्यास आपल्या भेटीस दौलताबाद येथें बोलावून घेतले. त्याप्रमाणे लखुजी हा आपल्या घरच्या मंडळांसह दौलताबाद येथें येऊन, त्यानें आपल्या सैन्या- सह शहराबाहेर तळ दिला; व त्याचा भाऊ जगदेवराव हा किल्याबाहेर कोतु- छुकच्या तळ्यावर उतरला. नंतर उरलेल्या दिवशीं लखुजी बाधवराव दा आपले मुलगे अचलोजी व राघोजी, व नातू यशवंतराव व इतर आप्तस्वकीय बरोबर घेऊन किल्ल्यावर शहाच्या भेटीस गेला; तेथे गेल्यावर ह्या सर्व लोकांना असे समजविण्यांत आले की, "सरकार स्वारीस तुमची भीति वाटते; म्हणून